प्रतिनिधी : जुबेर शेख
तुळजापूर : आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया १० नोव्हेंबरपासून सुरू झाली असून,आज चौथ्या दिवसाअखेर तुळजापूर नगरपरिषदेतील पहिला उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे. प्रभाग क्रमांक दोनमधून औदुंबर पंडितराव कदम यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करून निवडणुकीच्या शर्यतीला सुरुवात केली आहे.
औदुंबर पंडितराव कदम यांनी तहसीलदार अरविंद बोळंगे व नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे यांच्या समोर उमेदवारी अर्ज दाखल केला.या प्रक्रियेदरम्यान त्यांच्यासोबत त्यांचे समर्थकही उपस्थित होते.निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख १७ नोव्हेंबर आहे,त्यामुळे आता उर्वरित दिवसांमध्ये इतर इच्छुक उमेदवार देखील आपले अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे.
तुळजापूर नगरपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर पहिल्याच चार दिवसांत केवळ एक अर्ज दाखल झाल्याने नगरपरिषदेतील राजकीय वातावरणात शांतता होती.मात्र औदुंबर पंडितराव कदम यांनी अर्ज दाखल केल्यानंतर आता या प्रभागात निवडणुकीची हलचाल सुरू झाली आहे.
प्रभाग क्रमांक दोनमधील मतदार आता उत्सुकतेने पाहत आहेत की औदुंबर पंडितराव कदम यांच्याविरोधात कोण उमेदवार रिंगणात उतरणार आहे.स्थानिक पातळीवर या प्रभागात गेल्या काही दिवसांपासून विविध पक्षांचे कार्यकर्ते प्रचाराच्या तयारीत व्यस्त असून,औपचारिक अर्ज दाखल प्रक्रियेला सुरुवात झाल्याने राजकीय चर्चांनाही उधाण आले आहे.
राजकीय निरीक्षकांच्या मते,पुढील काही दिवसांत अनेक दिग्गजांची नावे समोर येण्याची शक्यता आहे.मात्र,पहिला अर्ज औदुंबर पंडितराव कदम यांच्या नावावर गेल्याने ते सध्या चर्चेचा विषय ठरले आहेत.

0 टिप्पण्या