Ticker

6/recent/ticker-posts

तुळजापूर नगरपरिषद निवडणूक : पाचव्या दिवसाअखेर उमेदवारी अर्जांची संख्या सातवर

 


प्रतिनिधी : जुबेर शेख 

तुळजापूर:तुळजापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी ११ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला पाचवा दिवस पूर्ण झाला असून,आतापर्यंत एकूण सात उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे नगराध्यक्ष पदासाठी अद्याप एकही अर्ज दाखल झालेला नाही.


चौथ्या दिवशी प्रभाग क्रमांक २ मधून औदुंबर पंडितराव कदम यांनी दाखल केलेल्या अर्जानंतर, पाचव्या दिवशी सहा उमेदवारांनी आपला अर्ज तहसीलदार अरविंद बोळंगे व नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे यांच्या उपस्थितीत दाखल केला.


पाचव्या दिवशी दाखल झालेले अर्ज 


प्रभाग ५-अ: साठे महानंदाबाई किशोर


प्रभाग ६-अ: कदम हेमा औदुंबर


प्रभाग १०-अ: रोचकरी सचिन ज्ञानोबा


प्रभाग १०-ब: रोचकरी पल्लवी सचिन


प्रभाग १०-ब: सुर्यवंशी स्नेहा संग्राम


प्रभाग ११-ब: सुर्यवंशी स्नेहा संग्राम


उमेदवारी अर्जांची संख्या वाढतेय


अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत १७ नोव्हेंबर आहे.आतापर्यंत फक्त सात अर्ज दाखल झाले असले तरी,शेवटच्या दोन दिवसांत अर्ज दाखल करण्याचा वेग वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.विशेषतः नगराध्यक्ष पदासाठी अद्याप एकही अर्ज दाखल झाला नसल्याने स्थानिक राजकारणात याबाबत मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे.


निवडणुकीचे औपचारिक वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर आता सर्वच पक्ष आणि संभाव्य उमेदवार तयारीत आहेत.कोणते नवे चेहरे पुढे येतात, कोणते अनुभवी नेते निवडणूक रिंगणात उतरतात,आणि नगराध्यक्ष पदाला कोणाकडून पहिला अर्ज दाखल होतो,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


तुळजापूर शहरात निवडणुकीची रंगत वाढू लागली असून येत्या दोन दिवसांत उमेदवारी अर्जांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या