प्रतिनिधी : जुबेर शेख
तुळजापूर : शिवसेना पक्षप्रमुख मा. एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार व पक्षाचे सचिव संजय मोरे,उपनेते ज्ञानराज चौगुले,जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक,सहसंपर्कप्रमुख भगवान देवकते तसेच धाराशिव जिल्हाप्रमुख मोहन पनुरे यांच्या मार्गदर्शनाखाली तुळजापूर तालुक्यात शिवसेनेचा झेंडा जोमाने फडकत आहे.तालुक्यातील विविध गावांमध्ये सलग शाखा उद्घाटनांचा धडाका सुरू असून आतापर्यंत तब्बल ४७ हून अधिक शाखांचे उद्घाटन पार पडले आहे.
तालुक्यातील वानेगावसह अनेक गावांमध्ये नुकतेच शाखा उद्घाटन सोहळे उत्साहात संपन्न झाले.या कार्यक्रमांना तुळजापूर तालुकाध्यक्ष अमोल जाधव यांची प्रमुख उपस्थिती लाभली.प्रत्येक गावामध्ये युवकांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. “गावोगावी शिवसेना, घराघरात बाळासाहेबांची विचारधारा” हा संकल्प अमोल जाधव यांनी यावेळी व्यक्त केला. गाव खेड्यांमध्ये शिवसेना संघटन बळकट करण्याचा व प्रत्येक नागरिकांपर्यंत पक्षाची विचारधारा पोहोचवण्याचा त्यांचा निर्धार दिसून आला.
या उद्घाटन सोहळ्यांमध्ये संबंधित गावांतील शाखाध्यक्ष,उपाध्यक्ष,सचिव,कोषाध्यक्ष,सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले. गावातील नागरिकांनी फटाके फोडून,घोषणा देत व फडके फडकवून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले.
या प्रसंगी तुळजापूर शहर प्रमुख बापूसाहेब भोसले,शहर उपाध्यक्ष रमेश चिवचिवे,संभाजी नेपते,शहाजी हाके,स्वप्निल सुरवसे,संजय लोंढे,नितीन मस्के,गणेश पाटील,विकास जाधव,भुजंग मुकेरकर, आप्पासाहेब पाटील,सोमनाथ गुड्डे यांसह तालुक्यातील मान्यवर पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
यावेळी बोलताना तालुकाप्रमुख अमोल जाधव म्हणाले की,“शिवसेना ही फक्त राजकीय संघटना नसून ती एक विचारधारा आहे. बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन आपण गावोगावी संघटन विस्तारत आहोत.प्रत्येक युवकाने शिवसेनेच्या माध्यमातून समाजसेवा करावी आणि जनतेच्या अडचणीसाठी सदैव तत्पर राहावे.”
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्वांनी पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दर्शवून आगामी निवडणुकांमध्ये शिवसेनेचा भगवा झेंडा अधिक उंच फडकवण्याचा संकल्प केला.


0 टिप्पण्या