Ticker

6/recent/ticker-posts

धाराशिव जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागांना उद्या पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा दौरा; राज्य शासनाकडून मदत सामग्रीचे वितरण

 

प्रतिनीधी : जुबेर शेख 

धाराशिव:धाराशिव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी तातडीने पुढाकार घेत राज्य शासनाशी संपर्क साधला आहे.


याबाबत परिवहन मंत्री तथा पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे जनसंपर्क अधिकारी अभिजीत भोसले यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, पालकमंत्री सरनाईक यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत चर्चा केली आहे. या चर्चेनंतर आपत्तीग्रस्तांसाठी तातडीने मदत सामग्री उपलब्ध करून देण्यात आली आहे.


ही मदत सामग्री घेऊन पालकमंत्री सरनाईक उद्या दिनांक 24 सप्टेंबर 2025 रोजी धाराशिव जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागांना भेट देणार आहेत. यावेळी ते स्थानिक अधिकाऱ्यांशी समन्वय साधून मदत सामग्रीचे वितरण करतील तसेच नुकसानीचे प्रत्यक्ष आढावा घेतील.


अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे पिके, घरे व रस्ते यांचे मोठे नुकसान झाले असून, जिल्हा प्रशासनाच्या वतीने बचाव व मदतकार्य सुरू आहे. पालकमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे आपत्तीग्रस्त नागरिकांना तातडीची मदत मिळून दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


👉 मुख्य मुद्दे:


अतिवृष्टीग्रस्त भागांसाठी राज्य शासनाकडून मदत सामग्री उपलब्ध


पालकमंत्री प्रताप सरनाईक उद्या (24 सप्टेंबर) धाराशिव जिल्ह्यात दौऱ्यावर


मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर निर्णय


मदत सामग्रीचे थेट वितरण व नुकसानीचा आढावा




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या