Ticker

6/recent/ticker-posts

चोरीस गेलेल्या मोटार सायकलचा तात्काळ शोध घेऊन गुन्हेगारांवर कारवाई करण्याची मागणी

 

प्रतिनिधी : जुबेर शेख 

तुळजापूर : तुळजापूर शहर व परिसरातून चोरीस गेलेल्या मोटार सायकलचा तात्काळ शोध घेऊन गुन्हेगारांवर कारवाई करण्याची मागणी तुळजापूर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले युवक आघाडीच्या वतीने युवक तालुकाध्यक्ष शुभम कदम यांनी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री डॉ रामदास आठवले यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. 


(दि २२) ऑगस्ट रोजी केंद्रीय मंत्री तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ रामदास आठवले हे धाराशिव जिल्हा दौ-यावर आले होते. यावेळी तुळजापूर रिपाई युवक आघाडीच्या वतीने सत्कार करून विविध मागणीचे निवेदन देण्यात आले.   


केंद्रीय मंत्री डॉ रामदास आठवले यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तुळजापूर शहर व परिसरामध्ये गेल्या अनेक महिन्यापासून सातत्याने मोटार सायकल चोरीचे प्रमाण वाढले असून मोटार सायकल चोरांचे पोलीस प्रशासनासमोर मोठे आवाहन उभे राहिले आहे महिना दीड महिन्याच्या कालावधीने सर्रास मोटार सायकल चोरीस जात आहे मोटार सायकल चोरीस गेल्यानंतर वाहन मालकांकडून पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यापासून महिने वर्ष लोटले तरी वाहनधारकांना गाडी सापडते ना चोरांवर कारवाई झालेल्या ची माहिती मिळते पोलीस प्रशासनाकडून काळजी करू नका जवळपासच्या परिसरामध्ये स्वतः तुम्ही पण शोध घ्या आम्ही सर्व लेन्सवर पाठवतो येथे ना तिथे कुठल्या ना कुठल्या मध्ये गाडी सापडेल असे सांगून तक्रारदारांना थोपविले जाते अशाने मोटरसायकल मालकांना चोरीस गेलेले वाहन मिळण्याची जवळपास शाश्वती सोडून द्यावी लागते. 


तुळजापूर शहर हे श्री तुळजाभवानी देवीचे तीर्थक्षेत्र असल्याने मोटर सायकलवर ही येणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे कधी भाविकांची मोटरसायकल चोरीला जाते तर कधी स्थानिक नागरिकांची मोटरसायकल चोरीला जातात याला पायबंध घालण्यास तुळजापूर पोलीस प्रशासन अपयशी झाल्याचे दिसून येते आहे मोटार चोरांचे पोलिसांसमोर मोठे आवाहन असताना तुळजापूर पोलीस ठाण्याचे काही पोलीस कर्मचारी बीट प्रमुख हे शहरात सुरू असलेल्या अवैध व्यवसाय धारकांकडून चिरीमिरी घेण्यात दंग झाले आहेत ज्या बीट परिसरातून वाहन चोरीस गेले आहे मोबाईल चोरीस गेले आहे त्या भागातील पोलीस बीट प्रमुख यांना जबाबदार धरून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी.


तात्काळ तुळजापूर शहर व परिसरात चोरीला गेलेल्या मोटरसायकलचा शोध घेऊन मोटार चोरांवर कायदेशीर कारवाई करून मोटार वाहन चोरीला आळा घालून वाहनधारकांना दिलासा द्यावा.अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले युवक आघाडीच्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.


निवेदनावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले युवक तालुकाध्यक्ष शुभम कदम,तालुकाध्यक्ष अरूण लोखंडे,दत्ता चौधरी किसन पांडागळे आदिंसह पदाधिकारी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या