Ticker

6/recent/ticker-posts

आंबेगाव तालुक्यात आरपीआय (आठवले) व सिद्धार्थ जिव्हाळा प्रतिष्ठान शिनोली यांच्या वतीने मान्यवरांचा फेटा बांधून सत्कार

 

प्रतिनिधी : मिलिंद भांगरे

आंबेगावरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) आंबेगाव तालुका जिल्हा पुणे व सिद्धार्थ जिव्हाळा प्रतिष्ठान शिनोली यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात माननीय अजित भाऊ रणदिवे, जिल्हाध्यक्ष आरपीआय ईशान्य मुंबई यांचा तसेच विविध मान्यवरांचा फेटा बांधून सत्कार करण्यात आला.


कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून गणेश कसबे पाटील (तालुकाध्यक्ष आरपीआय आठवले, आंबेगाव तालुका), जितेंद्र फाले (माजी सैनिक, अध्यक्ष सिद्धार्थ जिव्हाळा प्रतिष्ठान शिनोली), सुरेश फाले (ज्येष्ठ उपाध्यक्ष आरपीआय, ईशान्य मुंबई), सुभाष हत्ते (सदस्य, सिद्धार्थ जिव्हाळा प्रतिष्ठान शिनोली), बंडु फाले (सदस्य, सिद्धार्थ जिव्हाळा प्रतिष्ठान शिनोली) यांच्या हस्ते सत्कार सोहळा संपन्न झाला.


या वेळी नबाजी फुलपगार (सचिव, ईशान्य मुंबई), वसंत सोनवणे (ज्येष्ठ मार्गदर्शक, आरपीआय), राजू वाघमारे, बाळु भोसले, गौतम त्रिभुवन, संतोष खरात (मुलुंड तालुका उपाध्यक्ष), विजय पवार (वार्ड सरचिटणीस), शशी खरात, महेश मोरे, किशोर संगारे आदी मान्यवरांचा देखील फेटा बांधून गौरव करण्यात आला.


तसेच या कार्यक्रमात यश फाले (बौद्धाचार्य, भारतीय बौद्ध महासभा आंबेगाव तालुका), क्रिश फाले, जनार्दन फाले व इतर मान्यवर उपस्थित होते.


कार्यक्रमाची सुरुवात तथागत भगवान गौतम बुद्ध व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून करण्यात आली.


सुत्रसंचालन प्रकाश बोहाडे यांनी केले तर आभार प्रदर्शन जितेंद्र फाले (माजी सैनिक) यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या