प्रतिनिधी : जुबेर शेख
धाराशिव: महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्य मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार व राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री प्राध्यापक तानाजी सावंत हे तब्बल नऊ महिन्यांच्या शांततेनंतर पुन्हा एकदा राजकीयदृष्ट्या सक्रिय होत असल्याचे संकेत मिळाले आहेत.
अलीकडेच त्यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीची माहिती स्वतः तानाजी सावंत यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर पोस्ट करत दिली आहे.
त्यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे की, “शिवसेना पक्षाचे मुख्य नेते व राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडून तातडीने भेटीचा निरोप आला. त्या निमित्ताने मी मुंबईला जाऊन साहेबांची भेट घेतली. साहेबांसोबत तब्बल दोन तास विविध राजकीय घडामोडींवर आणि राज्याच्या विकासाच्या मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली.”
👉 या भेटीत परंडा मतदारसंघातील प्रश्न, स्थानिक विकासकामे, तसेच आगामी राजकीय समीकरणांवरही चर्चा झाल्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.
👉 तानाजी सावंत यांनी बराच काळ मतदारसंघातील सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर राहिल्यानंतर अचानक उपमुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतल्याने त्यांच्या पुढील राजकीय हालचालींना वेगळे महत्व प्राप्त झाले आहे.
👉 परंडा मतदारसंघात आगामी काळात ते पुन्हा जोरदारपणे कामाला लागतील, अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू झाली आहे.
राजकारणातील या नव्या घडामोडींमुळे परंडा मतदारसंघातील स्थानिक राजकारणात चैतन्य निर्माण झाले असून, येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पार्श्वभूमीवर या हालचालींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
0 टिप्पण्या