Ticker

6/recent/ticker-posts

महावितरण सहाय्यक कर्मचाऱ्यांसाठी सकारात्मक पाऊल : ऊर्जा राज्यमंत्रींच्या अध्यक्षतेखाली बैठक

 


प्रतिनिधी : जुबेर शेख 

मुंबई महावितरणमधील सर्व सहाय्यक कर्मचाऱ्यांना नियमित सेवेत तीन वर्षांचा कालावधी ग्राह्य धरण्याबाबत महत्त्वपूर्ण घडामोड झाली आहे. २१ ऑगस्ट २०२५ रोजी मुंबईतील एचएसबीसी बिल्डिंग,फोर्ट येथे राज्याच्या ऊर्जा राज्यमंत्री मेघनाताई साकोरे-बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली यासंदर्भात विशेष बैठक पार पडली.


या बैठकीस धाराशिवचे आमदार कैलास (दादा) पाटील यांची विशेष उपस्थिती होती. महावितरणचे संचालक (मा.सं.) राजेंद्र पवार,कार्यकारी संचालक (प्रकल्प) औंढेकर तसेच मुख्य कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी बैठकीत सहभागी झाले होते.


बैठकीत आमदार कैलास पाटील यांनी इतर शासकीय विभागांप्रमाणेच महावितरण सहाय्यकांचा तीन वर्षांचा सेवाकाल नियमित सेवेत गणला जावा,या मागणीसाठी ठामपणे पाठपुरावा केला.यावर समिती नेमून ४५ दिवसांत प्रस्ताव सादर करण्याचे आदेश ऊर्जा राज्यमंत्री महोदयानी महावितरण प्रशासनाला दिले.

कर्मचाऱ्यांच्या वतीने प्रतिनिधी ओंकार केसकर यांनी शासन निर्णय,परिपत्रके व उपदान सेवानियमांचा दाखला देत सहाय्यक पदाचा सेवाकाल ग्राह्य धरण्याची मागणी मांडली. प्रशासनाच्या वतीने सकारात्मक निर्णयाचा शब्द देण्यात आला.


या बैठकीस निलेश भिरंगे,प्रदीप घुले,ज्ञानेश्वर राऊत,समाधान सानप व सोमनाथ टाळकुटे आदी कर्मचारी प्रतिनिधी उपस्थित होते.


सहाय्यक कर्मचाऱ्यांच्या महत्त्वाच्या प्रश्नाचा पाठपुरावा करून ऊर्जा राज्यमंत्री स्तरावर बैठक घेण्याची पुढाकार घेतल्याबद्दल आमदार कैलास (दादा) पाटील यांचे कर्मचारी वर्गातर्फे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या