प्रतिनिधी : जुबेर शेख
मुबंई : राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे ६ ते ८ ऑगस्ट २०२५ या कालावधीत छत्रपती संभाजीनगर, धाराशिव आणि जालना या तीन जिल्ह्यांच्या दौऱ्यावर असून, त्यांच्या या दौऱ्यात विविध शासकीय आढावा बैठका, नागरिकांच्या निवेदनांची स्वीकृती, पत्रकार परिषदा, तसेच धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभाग यांचा समावेश आहे.
६ ऑगस्ट - छत्रपती संभाजीनगरमध्ये आगमन
बावनकुळे बुधवारी, ६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५.१५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून इंडिगो विमान (क्र. ६ई-५०२७) ने सायंकाळी ७.२५ वाजता छत्रपती संभाजीनगरकडे रवाना झाले. रात्री ८.२५ वाजता तेथे पोहोचून व्हीआयपी शासकीय विश्रामगृहात मुक्काम केला.
७ ऑगस्ट - धाराशिव व तुळजापूर दौरा
गुरुवारी, ७ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता मोटारीने बीडमार्गे धाराशिवकडे प्रयाण केले. सकाळी ११.३० वाजता धाराशिव येथे आगमन झाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात नागरिकांच्या निवेदनांची स्वीकृती झाली. त्यानंतर महसूल विभागाच्या विविध यंत्रणांचा आढावा घेण्यात आला. यामध्ये मुद्रांक व नोंदणी विभाग, भूमी अभिलेख विभाग यांचा समावेश होता.
दुपारी ३.३० वाजता झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी स्थानिक प्रशासकीय कामकाज आणि नागरिकांच्या समस्या याविषयी माहिती दिली. त्यानंतर संध्याकाळी ५.३० वाजता तुळजापुरात आगमन करून त्यांनी श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. यावेळी श्रीक्षेत्र तुळजापूर विकास आराखड्यावरील कार्यक्रमातही त्यांचा सहभाग झाला.
रात्री ७.३० वाजता ते पुन्हा धाराशिवच्या शासकीय विश्रामगृहात परत गेले आणि तेथे मुक्कामी थांबले.
८ ऑगस्ट - मुरुम व जालना दौरा
शुक्रवारी, ८ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता महसूल मंत्री मुरुम (ता. उमरगा) कडे रवाना झाले. सकाळी ९.३० वाजता ते श्री विठ्ठलसाई सहकारी साखर कारखान्यावर आयोजित शेतकरी मेळाव्यात सहभागी झाले. नंतर ११ वाजता मोटारीने जालन्याकडे प्रयाण झाले.
दुपारी ३.३० वाजता जालना शासकीय विश्रामगृहात पोहोचून त्यांनी नागरिकांच्या निवेदनांची स्वीकृती घेतली. यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत मुद्रांक व नोंदणी आणि भूमी अभिलेख विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला.
सायंकाळी ७.३० वाजता पत्रकार परिषद झाली. त्यानंतर रात्री ८ वाजता भाजपा कार्यालय, संभाजीनगर कॉलनी येथे पक्ष बैठकीला उपस्थित राहिल्यानंतर, रात्री ९ वाजता भोकरदनकडे प्रयाण करून रात्री १० वाजता तेथे मुक्काम केला.
दौऱ्याचा उद्देश: प्रशासन, जनता आणि विकास यांचा समन्वय
महसूल मंत्री बावनकुळे यांच्या या दौऱ्याचा मुख्य उद्देश महसूल विभागाच्या कामकाजाचा आढावा घेणे, थेट जनतेच्या समस्या समजून घेणे आणि विकासकामांचा आढावा घेणे असा आहे. तीनही जिल्ह्यांमध्ये झालेल्या बैठका, भेटी आणि संवादातून प्रशासन आणि जनतेमध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न झाला असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
0 टिप्पण्या