प्रतिनिधी : जुबेर शेख
तुळजापूर : धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत तुळजापूर शहरातील आणि तालुक्यातील असंख्य युवकांनी शिवसेना (शिंदे गट) पक्षात जाहीर प्रवेश केला.
तुळजापूर शहरातील युवक नेते सौरभ भोसले यांनी आपल्या सहकाऱ्यांसह शिवसेनेत प्रवेश करत तालुक्यातील राजकीय समीकरणांना कलाटणी दिली आहे.
सौरभ भोसले यांच्यासोबत शुभम दहीहंडे,अर्जुन परदेशी,अनिमेष बर्वे,आफताब तांबोळी,आसिफ तांबोळी,तुषार दहीहंडे,आकाश बर्वे,अनिकेत बर्वे,मेहफूज बागवान,सिद्धार्थ दहीहंडे,समर्थ लोंढे,अबरार बागवान,लखन डावखरे,निलेश देवकर,रोहित भोसले,ओम मुकेरकर,फैजान सिद्दिकी,रेहान बागवान,दुर्गेश वराडे,आलफाज तांबोळी,हरामत खान,आलिम शेख,सचिन गायकवाड,जावेद शेख,प्रवीण तिकोणे,सहदेव हुच्चे,दर्शन जुमाळे,सायबा नवगिरे,गणेश नवगिरे,मेघराज परदेशी या महत्त्वपूर्ण युवकांनी तसेच त्यांच्यासोबत असंख्य युवकांनी शिवसेना पक्षांमध्ये जाहीर प्रवेश घेतला.
या प्रवेश सोहळ्यात मराठवाडा युवा सेना प्रमुख बाजीराव चव्हाण,युवा सेना जिल्हाध्यक्ष गणेश जगताप,तालुका अध्यक्ष अमोल जाधव यांच्या नेतृत्वाखाली युवकांनी पक्षप्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेनेत आपली निष्ठा दाखवली.
या मोठ्या पक्षप्रवेशामुळे तुळजापूर शहर आणि तालुक्यात राजकीय खळबळ निर्माण झाली आहे. अलीकडेच झालेल्या महिलांच्या पक्षप्रवेशानंतर आता युवकांचाही शिवसेनेकडे ओढा दिसून येत आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवता हा पक्षप्रवेश अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
यावेळी बोलताना पालकमंत्री प्रताप सरनाईक म्हणाले,
"सर्व तरुणांसोबत मी सदैव उभा राहणार आहे. युवकांचे योगदान आणि उत्साह पाहता शिवसेना अधिक बळकट होणार आहे."
युवकांच्या या सहभागामुळे तुळजापूर तालुक्यात शिवसेनेची जडणघडण अधिक गतीने होत असून आगामी काळात याचे पडसाद राजकीय पातळीवर उमटणार यात शंका नाही.
0 टिप्पण्या