Ticker

6/recent/ticker-posts

धाराशिव मध्ये लाचखोरीचा पर्दाफाश: विभागीय स्थापत्य अभियंत्याला ९,०००/- लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक

 


प्रतिनिधी : जुबेर शेख 

धाराशिव : धाराशिव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने एका यशस्वी सापळा कारवाईत विभागीय स्थापत्य अभियंता शशिकांत उबाळे यांना रु. ९,०००/- लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली आहे.


धाराशिव येथे वास्तव्यास असलेल्या ३६ वर्षीय गुत्तेदार तक्रारदाराने दिनांक १८ जुलै रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार, धाराशिव बस स्थानक परिसरात तक्रारदारास वाटप करण्यात आलेल्या वाहनतळ जागेचा ताबा मिळावा, तसेच बाजूच्या कँटीनकडील पार्किंगचे शटर बंद करण्यासाठी विभागीय स्थापत्य अभियंता शशिकांत अरुण उबाळे (वय ४९) यांनी रु. १५,०००/- लाचेची मागणी केल्याची माहिती देण्यात आली होती.


पडताळणीदरम्यान उबाळे यांनी डीसी साहेबांसाठी रु. ५,०००/- आणि स्वतःसाठी रु. ४,०००/- अशी एकूण रु. ९,०००/- लाच घेण्यास तयार असल्याचे पंचासमक्ष मान्य केले.


आज दिनांक २२ जुलै रोजी धाराशिव बस स्थानक आवारात सापळा रचण्यात आला. तक्रारदाराकडून पंचासमक्ष लाच स्वीकारताना उबाळे यांना रंगेहाथ अटक करण्यात आली. त्यांच्या अंगझडतीदरम्यान रु. ९,०००/- ची लाच रक्कम, मोबाईल फोन व अन्य वस्तू जप्त करण्यात आल्या.


उबाळे यांच्या सोलापूर येथील अंत्रोळीनगर, होडगी रोड वरील निवासस्थानी तत्काळ घरझडतीसाठी पथक रवाना करण्यात आले असून घरझडतीची प्रक्रिया सुरू आहे.

दरम्यान, आनंदनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपीला अटक करून पुढील तपास करण्यात येणार आहे.


सापळा अधिकारी: श्री. विजय वगरे, पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धाराशिव (मो. 7722011245)


सापळा पथक: पोनि. वगरे, बाळासाहेब नरवटे, पो. अंमलदार तावसकर, हजारे, काझी (सर्व ला.प्र.वि., धाराशिव)


मार्गदर्शक अधिकारी: श्रीमती माधुरी कांगणे (पो. अधीक्षक, ला.प्र.वि., संभाजीनगर), श्री. सुरेश नाईकनवरे (अपर पो. अधीक्षक)


पर्यवेक्षण अधिकारी: श्री. योगेश वेळापुरे, पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि., धाराशिव (मो. 9049519833)


टोल फ्री क्रमांक: 1064


ईमेल: dysposmanabad@gmail.com


शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांनी लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या