Ticker

6/recent/ticker-posts

शिवसेना शाखेचे मानेवाडी येथे भव्य उद्घाटन; पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न

 


प्रतिनिधी : जुबेर शेख 

तुळजापूर : तुळजापूर तालुक्यातील मौजे मानेवाडी येथे शिवसेनेच्या नव्याने स्थापन करण्यात आलेल्या शाखेचे भव्य उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे,सचिव संजय मोरे यांच्या आदेशाने व मार्गदर्शनाखाली संपन्न झाले. या कार्यक्रमाचे उद्घाटन मा.प्रताप सरनाईक (पालकमंत्री,धाराशिव) यांच्या शुभहस्ते उत्साहात पार पडले.


उद्घाटन प्रसंगी शिवसेनेचे वरिष्ठ नेते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यामध्ये


मा. ज्ञानराज चौगुले (शिवसेना उपनेते,महाराष्ट्र राज्य),


मा. भगवान देवकते (सह-संपर्क प्रमुख,धाराशिव),


मा. मोहन पनुरे (जिल्हाप्रमुख, धाराशिव) यांचा विशेष सहभाग होता.



या शाखा उद्घाटनासाठी स्थानिक नेतृत्वही सक्रिय होते.शिवसेना नेत्या मिनाताई सोमाजी,तालुकाध्यक्ष अमोल जाधव तसेच शिवसेना नेते सोमनाथ गुड्डे,शहाजी हाक्के,शाखाप्रमुख लक्ष्मण माने,उपशाखाप्रमुख धनाजी गडदे आणि सचिव संभाजी माने यांनी आयोजनाची जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडले.


या प्रसंगी बोलताना पालकमंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, “शिवसेनेच्या कार्याचा विस्तार प्रत्येक गावपातळीपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय असून, मानेवाडीतील ही शाखा जनतेशी थेट संपर्क राखणारा मजबूत दुवा ठरेल.”


या कार्यक्रमाचे आणखी एक विशेष वैशिष्ट्य म्हणजे मानेवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदावर प्रथमच शिवसेनेच्या महिलेला संधी मिळाली आहे. ही ऐतिहासिक घडामोड गावात आणि पक्षात चर्चेचा विषय ठरली असून महिलांना सक्षमता आणि नेतृत्वाच्या दिशेने चालना मिळाली आहे.


कार्यक्रमानंतर गावातील नागरिक आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.भविष्यात मानेवाडीतील शिवसेनेची शाखा जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी एक प्रभावी केंद्र ठरेल,असा विश्वास व्यक्त करण्यात आला.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या