Ticker

6/recent/ticker-posts

बंजारा समाजाकडून पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा जाहीर सत्कार;विविध मागण्यांचे निवेदन सादर

 


प्रतिनिधी : जुबेर शेख 

तुळजापूर : धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा बंजारा समाजाच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. तुळजापूर तालुकाध्यक्ष अमोल जाधव यांच्या नेतृत्वाखाली भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात बंजारा समाजाच्या असंख्य महिला व पुरुषांनी सहभाग नोंदवत जल्लोषात पालकमंत्र्यांचे स्वागत केले.


या प्रसंगी पारंपरिक वेशभूषा परिधान केलेल्या बंजारा महिलांनी ढोल-ताशांच्या गजरात आणि फुलांनी सजवलेल्या मिरवणुकीत प्रताप सरनाईक यांचे जोरदार स्वागत केले. या भव्य सत्कार सोहळ्यात समाजबांधवांच्या भावना, अपेक्षा आणि व्यथा व्यक्त करण्यात आल्या. समाजावर गेल्या काही काळात होणाऱ्या अन्यायाविरोधात बंजारा समाजाने एकजुटीने आवाज उठवत पालकमंत्र्यांना निवेदन सादर केले.


पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी समाजबांधवांच्या या प्रेमळ स्वागताबद्दल आभार मानले व त्यांच्या समस्या समजून घेत त्वरित कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. समाजाच्या न्यायहक्कासाठी शासन पातळीवर आवश्यक त्या उपाययोजना राबविण्याचा शब्दही यावेळी त्यांनी दिला.


कार्यक्रमात उपनेते ज्ञानराज चौगुले,नितीन लांडगे,जिल्हाप्रमुख सुरज साळुंखे,तुळजापूर तालुका अध्यक्ष अमोल जाधव,तुळजापूर शहराध्यक्ष बापूसाहेब भोसले, सोमनाथ गुट्टे,नितिन मस्के,भुजंग मुकेरकर,रमेश चिवचिवे,गणेश नेपते,संजय लोंढे,स्वप्निल सुरवसे,मीनाताई सोमाजी,राधा घोगरे,रेणुका शिंदे,सारिका तेलंग,आरूणा कावरे यांच्यासह बंजारा समाजाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


या कार्यक्रमामुळे बंजारा समाजाला एक नवे बळ मिळाले असून, त्यांच्या समस्या शासन दरबारी पोहचविण्यासाठी हा एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या