प्रतिनिधी : जुबेर शेख
धाराशिव : भारतीय हवामान विभागाने (IMD) उद्या दिनांक २७ सप्टेंबर २०२५ रोजी धाराशिव जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देत जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद धाराशिव यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या शाळांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
याबाबत शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद धाराशिव यांनी आदेश दिले असून, संबंधित गटशिक्षणाधिकारी तसेच सर्व शाळांनी तत्काळ अंमलबजावणी करावी असे निर्देश दिले आहेत.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, काही भागात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता असल्याने ही खबरदारी म्हणून पावले उचलण्यात आली आहेत.
शाळांना सुट्टी देण्यामागील प्रमुख उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करणे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
पालक व विद्यार्थ्यांनीही हवामानाच्या परिस्थितीचा विचार करून खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

0 टिप्पण्या