Ticker

6/recent/ticker-posts

मतदाराच्या भूमिकेतून माळी समाजातील तरुण कार्यकर्त्यांनी सत्ताधार्‍यांच्या भूमिकेत यावे


प्रतिनिधी : पवन वाघमारे

बीड: माळी समाजाने मतदाराच्या भूमिकेत उमेदवाराच्या भूमिकेत यावं व जो राजकीय पक्ष माळी समाजाला सत्तेत प्रतिनिधित्व करण्याची संधी देणार नाही त्या राजकीय पक्षाविरुद्ध बंड करावे, असे आवाहन महात्मा फुले युवा दलाचे संस्थापक प्रमुख अ‍ॅड.सतिष शिंदे यांनी धाराशिव जिल्ह्यातील माळी सत्ता संवाद दौरा प्रसंगी बोलताना केले. 

माळी समाजाला लोकसंख्येनुसार ग्रामपंचायत,पंचायत समिती,जिल्हा परिषद,महानगरपालिका,नगरपरिषद,विधानसभा,विधान परिषद या सर्वच ठिकाणी सत्तेत वाटा मिळावा यासाठी महात्मा फुले युवा दलाचे संस्थापक प्रमुख अ‍ॅड. सतिष शिंदे महाराष्ट्रभर दौरे करत आहेत.समाजाला जागृत करण्यासाठी हे दौरे आयोजित केले आहेत. 

संपूर्ण देशामध्ये आणि महाराष्ट्रात माळी समाज मोठ्या संख्येने आहे. प्रत्येक जिल्हा,तालुका आणि गावांमध्ये माळी समाजाची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने संख्येच्या प्रमाणात माळी समाजाला प्रत्येक ठिकाणी सत्तेत वाटा मिळावा आणि मतदाराच्या भूमिकेतून माळी समाजातील तरुण कार्यकर्त्यांनी सत्ताधार्‍यांच्या भूमिकेत यावे अशी मानसिकता तयार करण्यासाठी महात्मा फुले युवा दलाचे संस्थापक प्रमुख अ‍ॅड.सतिष शिंदे व त्यांचे सर्व सहकारी यांनी दि. २० सप्टेंबर पासून महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात संवाद दौरा करुन समाजाला जागृत करण्याचे काम करत आहेत. 

प्रत्येक गावात जाऊन आपली भूमिका समजावून सांगत आगामी निवडणुकीमध्ये काय भूमिका घ्यायची यासाठी अ‍ॅड.सतिष शिंदे यांनी संवाद दौरा सुरू केला आहे. माळी समाज आतापर्यंत मतदारांच्या भूमिकेत होता, आता समाजाने सत्तेचा वाटा हक्काने मागितला पाहिजे अशी अ‍ॅड. सतिष शिंदे यांची भूमिका आहे. या दौर्‍यात महात्मा फुले युवा दल धाराशिव जिल्हा संघटक महेश क्षीरसागर,राम भानुसे व महात्मा फुले युवा मंच महात्मा फुले देवळाली युवा मंच श्री संत सावतामाळी अपशिंगा युवा मंच मंगरूळ युवा मंच काटी सावरगाव महात्मा फुले युवा दलाचे सर्व कार्यकर्ते,काक्रंबा,धाराशिव जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या