Ticker

6/recent/ticker-posts

पुणे जिल्हा हादरला..!स्कुल बसच्या ड्रायव्हरकडून बसमध्ये २ चिमुकल्यांवर अत्याचार;पोलिस स्टेशन येथे गुन्हा नोंद


प्रतिनिधी : प्रविन मोरे

पुणे: पुण्यात वानवडी परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. ४५ वर्षीय शाळा बसच्या ड्रायव्हरवर दोन ८ वर्षांच्या चिमुकलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.या घटनेने संपूर्ण पुण्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.पीडित मुलींवर चार दिवसांपासून अत्याचार करण्यात आले होते.परंतु आरोपीने त्यांना कुणालाही सांगितल्यास गंभीर परिणाम होण्याची धमकी दिली होती.

स्थानिक पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार,आरोपी एका नामांकित शाळेच्या विद्यार्थ्यांना बसमधून शाळेत सोडत होता.या दोन्ही मुली त्या बसमधील पुढच्या सीटवर बसायच्या.गेल्या ४ दिवसांत,ड्रायव्हरने मुलींवर अश्लील कृत्ये केले.पीडित मुलींपैकी एका मुलीला घरी येताच वेदना जाणवू लागल्या,ज्यामुळे तिच्या आईने तिचा विश्वासात घेत विचारणा केली.त्यानंतर मुलीने सर्व सत्य उघड केले,ज्यामुळे या घृणास्पद प्रकाराचा पर्दाफाश झाला.

पोलिसांनी तात्काळ आरोपीविरोधात पॉक्सो अ‍ॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.या घटनेची चौकशी सुरू असून आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याचे आश्वासन पोलिसांनी दिले आहे.समाजातील हा प्रकार गंभीर चिंता निर्माण करणारा आहे आणि या प्रकरणामुळे शाळेतील सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.सध्याच्या काळात अशा घटना पुन्हा न होण्यासाठी सरकाने कडक उपाययोजना करणे आवश्यक आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या