प्रतिनिधी:अशोक गरड
लातूर:लातूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे (दि.०३) रोजी वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजना जिल्हास्तरीय समितीची जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीसाठी अध्यक्ष सुरेश राठोड,महेश चव्हाण यांनी उपस्थित राहून जास्तीत जास्त तांड्यांना व बंजारा वस्तींना निधी कसा उपलब्ध करून दिला जाईल यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करून जास्तीत जास्त प्रस्ताव तांड्यावरील सुधार कामाचे प्रस्ताव देण्यात आले.
महेश चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना असे सांगितले की माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यावर विश्वास टाकून आदरणीय आमदार अभिमन्यू पवार यांनी उपलब्ध करून दिलेल्या संधीचं सोनं करून समाजाचे जास्तीत जास्त फायदा कसा होईल याकडे मी प्रयत्नशील राहील.
0 टिप्पण्या