प्रतिनिधी : जुबेर शेख
उमरगा :समाजातील उपेक्षित,वंचित व विकासापासून कोसो दूर राहिलेल्या समाजाला स्वकष्टाने जीवनाच्या गरजा पूर्ण करून सर्वांगीण विकासाची संधी प्राप्त करून घेणे हे जनतेचे मूलभूत हक्क आहेत . सामाजिक न्यायाचे त्यांचे हक्क कोणी नाकारत असेल आणि त्यांच्यावर जुलून जबरदस्ती करीत असेल तर शिक्षण आणि संघर्षातून ती जुलमी व्यवस्था बदलण्याचा अधिकार भारतीय संविधानाने आपणाला दिलेला असल्यानेच संविधामुळेच सामाजिक परिवर्तन शक्य आहे असे मत राज्याचे माजी मंत्री तथा बहुजन रयत परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.लक्ष्मणराव ढोबळे यांनी बोलताना व्यक्त केले .
धाराशिव जिल्ह्यातील उमरगा येथे बहुजन रयत परिषद महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या आदर्शवत कार्याबददल सामाजिक गुणगौरव पुरस्कार व गणेशोत्सवा दरम्यान विधायक उपक्रम राबविलेल्या उत्कृष्ट गणेश मंडळ , साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती निमित्त समितीच्या माध्यमातून विशेष उल्लेखनीय उपक्रम राबवणाऱ्या उमरगा - लोहारा तालुक्यातील जयंती उत्सव समितीचा सन्मान सोहळा पार पडला .यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून प्रा . ढोबळे बोलत होते . पुढे बोलताना ते म्हणाले की ,महाराष्ट्र व देशाला थोर समाजसुधारक , साहित्यिक , विचारवंत व महापुरुषांचा वैभवशाली वारसा आहे . अपेक्षित वर्तन बदलांसाठी त्यांनी दिलेले योगदान हे महत्वपूर्ण आहे . याच धर्तीवर बहुजन रयत परिषदेच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसांच्या न्याय हक्कासाठी राज्यात संघटन केले जात असून सामाजिक प्रश्नासाठी प्रसंगी संघर्षाची भूमिका ही घेतली जात आहे . युवक व महिला सक्षमीकरणासाठी ही बचत गट व उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न केले जात असल्याचे यावेळी सांगितले .
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उमरगा - लोहार तालुक्याचे लोकप्रिय आमदार .ज्ञानराज चौगुले,बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्ष अॅड. कोमलताई साळुंखे, उमरगा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती जितेंद्र शिंदे , हरीष डावरे , दिलीप भालेराव, डॉ . चंद्रकांत महाजन ,शरद किनीकर ,किरण गायकवाड , सुनील शिरसागर , पोपटराव झोंबाडे अण्णाभाऊ साठे पुरस्कार करते दिलीप गायकवाड ,श्रीमंत गायकवाड राजू कसबे , बबन बनसोडे , शिवाजी गायकवाड , दयानंद काळुंखे , ना म साठे नगरसेवक दीपक रोडगे योगेश येडळे दींची यावेळी उपस्थिती होती .याप्रसंगी आमदार ज्ञानराज चौगुले यावेळी बोलताना म्हणाले की उमरगा शहरांमध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा पूर्णाकृती व सभागृह होण्यासाठी नगर परिषदेच्या माध्यमातून मी सर्वोत्तरी प्रयत्न सहकार्य करून पूर्णत्व होण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही दिली अॅड.कोमलताई साळुंखे ' हरीश डावरे , शिवाजी गायकवाड यांची भाषणे झाली .प्रारंभी मान्यवरांचे हस्ते महारुषांच्या प्रतिमेचे पूजन व दिप प्रज्वलनाने कार्यक्रमाचे कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले .यावेळी मान्यवरांच्या हस्ते आदर्श शेतकरी मुकुंद मोरे , पत्रकार अंबादास जाधव ,निळकंठ कांबळे , सामाजिक कार्यकर्ते संजीव विभुते ,राजेंद्र माळी,अरुण रोडगे ,पो .नि . अश्विनी भोसले , समाजरत्न बाबा जाफरी वैद्यकिय सेवेतील कपिल महाजन , विद्यासागर फुलसुंदर , शिक्षकरत्न भगवान वाघमारे , विशेष सन्मानित भैरवनाथ कानडे , उद्योजक अनिल सगर , गोविंद जाधव , एस टी महामंडळाचे संजय कुंभार विद्युत वितरणचे अमोल माळी यांना सन्मानचिन्ह व मानपत्र देऊन सामाजिक गुणगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .शिवाय गणराज गणेश मंडळ व उमरगा लोहारा तालुक्यातील लोकशाहीर आण्णाभाऊ साठे उत्सव समिती प्रमुखांना सामाजिक उपक्रमामुळे सामाजिक कृतज्ञता पुरस्कार प्रदान करण्यात आला .या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाचे मुख्य आयोजक तथा बहुजन रयत परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष बालाजी गायकवाड यांनी तर स्वागतपर मनोगत बहुजन रयत परिषदेचे प्रदेश सरचिटणीस स्वागताध्यक्ष ईश्वर शिरसागर यांनी व्यक्त केले.सूत्रसंचालन मराठी भाषा समिती सदस्य भैरवनाथ कानडे यांनी केले .
ईश्वर क्षीरसागर यांनी उपस्थितांचे आभार मानलेया कार्यक्रम यशस्वीतेसाठी यांनी प्रयत्न केले श्री भागवत गायकवाड हॅलो उमरग्याचे संपादक बालाजी सर्वसाने किरण क्षीरसागर उमरगा तालुका बी आर पी सचिव संभाजी काळे उमरगा तालुका अध्यक्ष दीपक कांबळे तालुका उपाध्यक्ष मारुती थोरात तालुका संघटक प्रेम बिराजदार महिला तालुकाध्यक्ष मीनाक्षी गायकवाड उमरगा महिला शहराध्यक्ष लक्ष्मी वाघमारे महिला तालुका सचिव मीरा वाडेकर या कार्यक्रमाचे आयोजन बहुजन रयत परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष श्री बालाजी माधवराव यांनी केले होते.
यावेळी कार्यक्रमाला उपस्थिती विजय तोडकर सुधाकर बनसोडे सुखदेव होळीकर नेताजी गायकवाड दयानंद गायकवाड यावेळी सर्व बहुजन बहुसंख्येने समाज बांधव उपस्थित होते
0 टिप्पण्या