Ticker

6/recent/ticker-posts

उपविभागीय कार्यालय उमरगा येथे अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने १ आक्टोंबर पासून विविध मागण्यासाठी करण्यात येणार आमरण उपोषण

प्रतिनिधी : फिरोज पटेल 

उमरगा: उमरगा येथील उपविभागीय कार्यालय समोर अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने (दि.०१) रोजी पासून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी आमरण उपोषण करण्यात येणार आहे. 



यामध्ये प्रमुख मागण्या अशा आहेत की, 

१) सरसकट महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात यावी. 

२) सोयाबीनला प्रतीक क्विंटल ८५०० रुपये भाव देण्यात यावे.

३) मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या आत्महत्याग्रस्त कुटुंबांना तात्काळ न्याय देण्यात यावा. 

४) तुरोरी माध्यम प्रकल्पाच्या सांडव्यातून गळती होणारे पाणी तात्काळ थांबवण्यात यावे. 

५) नॅशनल हायवे क्रमांक ६५ चे अर्धवट राहिलेले काम तात्काळ करण्यात यावे.

६) मागणी मंडळ अधिकारी यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे. 

अशा अनेक विविध मागण्यासाठी अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने आमरण उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती धाराशिव युवक जिल्हाध्यक्ष बाळासाहेब माने यांच्या वतीने देण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या