प्रतिनिधी : जुबेर शेख
तुळजापूर:विधानसभा निवडणूक तोंडावर येताच तुळजापूर विधानसभेसाठी अनेक उमेदवार इच्छुक असल्याचे पाहायला मिळत आहेत.
तुळजापूर विधानसभेसाठी रोज एक एक नवीन उमेदवार इच्छुक असल्याचे बातमी सोशल मीडियावर पडत आहे कोणी पक्षावर उमेदवारीचा दावा करत आहे तर काही उमेदवार अपक्ष लढणार असल्याचे सांगत आहेत.त्यातच तुळजापूर विधानसभेत मध्ये समाजवादी पार्टीने एन्ट्री केली आहे.काही दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अल्पसंख्यांक जिल्हाप्रमुख आमिर शेख यांनी शिवसेनेला रामराम करत समाजवादी पार्टीमध्ये प्रवेश केला व धाराशिव जिल्हाध्यक्षपदी त्यांची निवड सुद्धा करण्यात आली.
निवड होताच त्यांनी तुळजापूर विधानसभेसाठी पक्षाकडे रीतसर उमेदवारीची मागणी केली आहे अशी माहिती मिळत आहे.त्यामुळे समाजवादी पार्टी येत्या काळात तुळजापूर विधानसभेमध्ये आपला उमेदवार देणार का? जर समाजवादी पार्टीने तुळजापूर विधानसभा लढवण्याचा निर्णय घेतल्यास तुळजापूर विधानसभा निवडणुकी पंचरंगी होणार असल्याचे पाहायला मिळत आहे.
अमीर शेख हे पहिले २००९ ते २०१७ या काळात काँग्रेस पक्षामध्ये होते.काँग्रेस पक्षामधून पंचायत समिती निवडणूक मध्ये टिकीट नाकारल्याने त्यांनी काँग्रेस पक्ष सोडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये प्रवेश केला होता.व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामधून पंचायत समिती निवडणूक लाढवली व ते २०१७ ते २०२२ पर्यंत सदस्य राहीले होते.तसेच पक्षाने त्यांच्यावर विश्वास ठेऊन त्यांना शिव अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष पद देखील देण्यात आले हाते. ते जिल्हाध्यक्ष पद चांगल्या उत्कृष्ट पद्धतीने जिल्हाध्यक्ष पदाचा कार्यकाळ संभाळले होते.अचानकपणे त्यांनी शिवसेनेला रामराम करत समाजवादी पार्टीमध्ये प्रवेश केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावलेल्या पाहायला मिळत आहे.
अमीर शेख यांचा तालुक्यामध्ये चांगलाच जनसमुदाय व कार्यकर्ते आहे.त्यामुळे ते तुळजापूर विधानसभेसाठी निवडणुकीमध्ये उतरल्यास इच्छुक दिग्गज आमदारांना चांगला फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
लवकरच येणाऱ्या काळात विधानसभेची आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्यामुळे कोणकोणत्या उमेदवारांची नावे तुळजापूर विधानसभेसाठी फायनल होतात याकडे संपूर्ण तुळजापूर विधानसभेच्या जनतेचे लक्ष लागले आहे.
0 टिप्पण्या