प्रतिनिधी : जुबेर शेख
तुळजापूर:अण्णासाहेब दराडे यांनी काढलेली चित्रतीयात्रा काल दिनांक २७ वार शुक्रवार रोजी वसंत नगर आणि तुळजाभवानी साखर कारखाना येथे आलेली होती यादरम्यान अण्णासाहेब दराडे यांनी जनतेशी संवाद साधला.
बोरीधरण झाले त्यावेळी तेथील नागरिकांचे पुनर्वसन होऊन वसंत नगर येथे त्यांना निवासासाठी जागा देण्यात आली, परंतु सदरील जागा आज रोजी सुद्धा संबंधिताच्या नावाने झालेली नाही. यासंदर्भात नागरिकांनी वेळोवेळी आंदोलन उपोषण केली, पण ही उपोषण मोडीत काढण्याचं व त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्याचे काम प्रशासनाने केलं, खरंतर हे दुर्दैव आहे १९७१ पासूनचा हा प्रश्न अजून सुद्धा सुटला नाही, खऱ्या अर्थाने हे लोकप्रतिनिधींचे अपयश आहे. आतापर्यंत किती आमदार होऊन गेले असतील त्यांनी या विषयाकडे कोणत्याही प्रकारचे लक्ष दिले नाही ही आपल्या तालुक्याची शोकांतिका आहे.
वसंत नगरला साडेतीनशे घरकुल मंजूर झाले, परंतु नागरिकांच्या नावांनी जागा नसल्यामुळे आलेली घरकुल परत गेली हे दुर्भाग्य आहे. आत्तापर्यंत हा प्रश्न सुटायला पाहिजे होता, पन्नास वर्षे होऊन गेली तरीसुद्धा हा प्रश्न सुटत नसेल तर प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना लाजा वाटल्या पाहिजे असे वक्तव्य अण्णासाहेब दर्डे यांनी केले. फक्त निवडणूक काळामध्ये देखावा करणारे लोकप्रतिनिधी पुन्हा पाच वर्ष जनतेला तोंड दाखवत नाहीत, मग त्यांच्या अडचणी कशा सुटतील हा प्रश्न गेली कित्येक वर्षापासून नागरिक सहन करत आहेत. वसंत नगर मधील जनतेने मला मतदान करावे अशीच माझी अपेक्षा नाही. तुम्ही मला मतदान करा किंवा नाही केलं तरी चालेल, पण हा जागेचा प्रश्न आपण सर्वजण मिळून एकत्र येऊन एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून मार्गी लावू आणि येथील जागा सर्व नागरिकांच्या नावाने होईल यासाठी आपण कायदेशीर लढाई लढू असे वचन अण्णासाहेब दराडे यांनी वसंत नगर येथील नागरिकांना दिले.
0 टिप्पण्या