प्रतिनिधी : जुबेर शेख
मुंबई:भारतीय जनता पार्टीचे नेते किरीट सोमय्या यांची पत्नी मेधा सोमय्या यांच्या मानहानीच्या खटल्यात संजय राऊत यांना माझगाव सेशन्स कोर्टाने दोषी ठरवलं आहे.कोर्टाने राऊतांना १५ दिवसांचा तुरुंगवास आणि २५ हजार रुपये दंड ठोठावला आहे.हे प्रकरण तब्बल २०२२ मध्ये उभं राहिलं,जेव्हा राऊत यांनी सोमय्या दांपत्यावर १०० कोटींच्या शौचालय घोटाळ्याचा आरोप केला होता.
राऊत यांनी म्हटले होते की,मिरा भाईंदर महापालिकेच्या शौचालय निर्मितीत फसवणूक केली गेली आहे.त्यानुसार मेधा सोमय्या यांच्या युवा प्रतिष्ठानला १६ शौचालये बांधण्यासाठी कंत्राट दिलं गेलं होतं.राऊतांनी आरोप केला की बनावट कागदपत्रांचा वापर करून फसवणूक केली गेली आहे आणि साडेतीन कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेची बिले घेतली गेली.
या प्रकरणात मेधा सोमय्या यांनी राऊतांच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल केला होता.जो कोर्टात स्वीकारण्यात आला. राऊतांच्या या आरोपांनी राजकीय वर्तमनात खळबळ माजवली होती आणि यामुळे भाजपा व शिवसेनेत तणाव निर्माण झाला होता.
संजय राऊत यांनी केलेले आरोप आणि त्यावर दिलेल्या उत्तरांमुळे या खटल्याला अनेक वळणं मिळाली.राऊतांनी भाजपच्या नेत्यांना भ्रष्टाचाराचे आरोप करण्यातही कसूर केली.या निर्णयानंतर आता राऊतांची प्रतिक्रिया काय असेल,हे पाहणं महत्त्वाचं ठरेल,विशेषत:ते उच्च न्यायालयात अपील करणार का हे पाहून देखील महत्वाचं ठरेल.
0 टिप्पण्या