Ticker

6/recent/ticker-posts

खोटे पंचनामे दाखल करून भूकंपग्रस्त प्रमाणपत्र हस्तगत करण्यास मदत केल्याप्रकरणी मंडळाधिकारी यांना निलंबित करा:अखिल भारतीय छावा संघटनेची मागणी


प्रतिनिधी : फिरोज पटेल 

लोहारा: अखिल भारतीय छावा संघटनेचे धाराशिव युवक जिल्हाध्यक्ष बाळासाहेब माने यांच्यावतीने उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.

निवेदनात असे सांगण्यात आले आहे की, लोहारा तालुक्यातील माकणी मंडळात अनेक भूकंपग्रस्त प्रमाणपत्राचे पंचनामे खोटे करून भूकंपग्रस्त प्रमाणपत्र हस्तगत करण्यात आले आहे. मंडळ अधिकारी यांच्याकडून खोटे पंचनामे दाखल केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.मौजे तोरंबा येथील रावसाहेब एकनाथ चव्हाण यांना चार आपत्य असताना त्यांच्या घरातील भूकंपग्रस्त प्रमाणपत्र एकाच वारसाचा पंचनामा करून इतर वारसांची संमती न घेता मंडळाधिकारी यांनी एकच मुलगा दाखवून खोटा पंचनामा दाखल केला.त्या लाभार्थ्यास भूकंपग्रस्त प्रमाणपत्र मिळवण्यासाठी मदत केली तसेच अनेक खोटे पंचनामे दाखल केल्याचे आढळून आले आहे.

सन २०२१ पासून २०२४ पर्यंतचे भूकंपग्रस्त फाईलचे सर्व पंचांना मी तपासणी करण्याची मागणी अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.ही चौकशी पुढील चार दिवसात करून निर्णय नाही घेतल्यास त्रिव आंदोलन छेडण्याचा इशारा देखील निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

यावेळी अखिल भारतीय छावा संघटनेचे धाराशिव युवक जिल्हाध्यक्ष बाळासाहेब माने,दयानंद चव्हाण,आनंद चव्हाण,सुरज भोसले,संदीप सावरे आदींच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या