प्रतिनिधी : अशोक गरड
औसा:औसा येथे मागील आठ दिवसापासून सुरू असलेल्या आम आदमी पार्टीच्या वतीने सोयाबीनला दहा हजार रुपये हमीभाव द्यावा व शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी अशा अनेक मागण्यासाठी अन्नत्याग आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार युवक यांच्यावतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक तालुकाध्यक्ष बाळासाहेब जाधव,विधानसभा अध्यक्ष अशोक गरड,विधानसभा उपाध्यक्ष पठाण समीर खान तसेच पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या