Ticker

6/recent/ticker-posts

तुळजापूर शहरात महिलांच्या सन्मानार्थ स्त्री शक्ति संवाद यात्रेचे आयोजन


प्रतिनिधी : जुबेर शेख 

तुळजापूर:महाराष्ट्र राज्यात महिलांवर होणाऱ्या अन्याय अत्याचार विरोधात हतबल घटनाबाह्य राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने राज्यभर महिलांच्या सन्मानार्थ स्त्री शक्ति संवाद यात्रा आयोजन करण्यात आली असून २५ सप्टेंबर रोजी वेळ सायंकाळी ६ वाजता तुळजापूर शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौक ते महाद्वार भव्य मशाल रॅली काढण्यात येणार आहे.

शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व सौ.रश्मी उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार स्त्री शक्ति संवाद यात्रा २४ ते ३० सप्टेंबर या दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात घेण्यात येत असून २६ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता शासकीय विश्रामगृह तुळजापूर येथे आढावा बैठक घेण्यात येणार आहे.

याप्रसंगी शिवसेना महिला आघाडी समन्वयक 
उपनेत्या ज्योतीताई ठाकरे,उपनेत्या छायाताई शिंदे संपर्क संघटक रोशनीताई कोरे गायकवाड,निरीक्षक सांजनाताई मुणगेकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

तुळजापूर तालुक्यातील व तुळजापूर शहरातील शिवसेना,महिला आघाडी शिवसैनिक,युवा सेना,विद्यार्थी सेना,मशाल यात्रेस उपस्थित राहावे तसेच अन नियोजित बैठकीस शिवसैनिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन धाराशिव जिल्हा महिला संघटक शामलताई शाम पवार-वडणे यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या