प्रतिनिधी : जुबेर शेख
तुळजापूर : तुळजापूर विधानसभेसाठी इच्छुक असलेले अपक्ष उमेदवार अण्णासाहेब दराडे यांनी काढलेली चित्र सध्या गावोगावी मुक्कामी फिरत असून रविवार सकाळी वाघदरी व संध्याकाळी दहिटना गुळहाळी करून शहापूर येथे मुक्कामासाठी पोहोचली होती.दिवसेंदिवस अण्णासाहेब दराडे यांच्या यात्रेला जनतेमधून प्रचंड प्रतिसाद मिळत असून गावचे नागरिक मोठ्या प्रमाणावर अण्णासाहेब दराडे यांना पाठिंबा देत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.दरम्यान नागरिकाशी संवाद साधताना अण्णासाहेब दराडे यांनी असे आश्वासन दिले की जीव गेला तरी चालेल परंतु जनतेच्या भावनेशी बेइमानी करणार नाही,तुम्ही माझ्यावरती विश्वास टाकून बघा तुमच्या विश्वासाला आयुष्यात कधीही तडा जाणार नाही.
रविवारी संध्याकाळी अण्णासाहेब दराडे यांचा मुक्काम शहापूर येथे एका गोठ्यावरती होता,त्याच ठिकाणी बोरवेलला त्यांच्या सहकार्यासह त्यांनी आंघोळ करून सकाळी नऊ वाजता शहापूर येथील नागरिकांशी संवाद साधला.
शहापूर येथील युवक सतीश जाधव यांनी नवीन हार्वेस्टर खरेदी केलेले असून त्याची पूजा अण्णासाहेब दराडे यांच्या हस्ते करण्यात आली.
रविवारी व सोमवारी अण्णासाहेब दराडे यांच्या यात्रेतील सर्व सहकाऱ्यासाठी जेवणाची व्यवस्था सागर भारत घुगे,गणेश अरुण नागरगोजे, नाना पाटील तसेच दादा शिलाजी घुगे यांनी केली.
0 टिप्पण्या