प्रतिनिधी:अशोक गरड
औसा: औसा येथे माऊली संगीत विद्यालयाची दुसरी शाखा गणेश नगर येथे सुरुवात करण्यात आली. माऊली विद्यालयाचे गुरुवर्य संगीत सम्राट शिवरुद्र स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली अशा सोमवंशी यांना संगीत शिक्षक म्हणून निवड करण्यात आली.
औसा शहर व परिसरातील लहान थोर व्यक्ती यांना संगीत शिकवण्यासाठी स्वामी गुरुजी हे अतोनातक तळमळीने आणि कष्टाने संगीत शिकवणी गेल्या १८ वर्षापासून करत आहेत त्याचाच भाग गुरुप्रसाद म्हणून गुरुजींनी दुसऱ्या शाखेचे उद्घाटन केले आहे.उद्घाटन नरसिंह राजे,हनुमंत लोकरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले त्यानंतर भजन गायन झाले.या विद्यालयांमध्ये गायन शिकण्यासाठी सर्वांनी याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आव्हान करण्यात आले आहे.
या विद्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी ॲड.भालचंद्र पाटील फत्तेपूरकर,ॲड.दत्तात्रय घोगरे,नरसिंग कुंभार,साहेबराव पाटील,खंडू भागवत वाघे,लोकरे सर,ओंकार चव्हाण,संगनाथ पवार,रितेश कदम,सौरभ जानकर,संगीताताई शिंदे इतर शिष्य परिवार आणि महिला हजर होत्या.
0 टिप्पण्या