प्रतिनिधी : जुबेर शेख
मुंबई: बदलापूर अत्याचार प्रकरणातील आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे.संपूर्ण देशाला हादरून सोडणाऱ्या बदलापूर बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे यांनी अचानक पोलिसांची रिव्हॉल्व्हर खेचून पोलिसांवर गोळ्या झाडले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस कारागृहातून पोलीस ठाण्यात घेऊन जात असताना अक्षयने जीप मधील पोलीस कर्मचाऱ्यांचे रिवाल्वर काढून पोलिसांवर ३ राऊंड फायर केले दरम्यान प्रत्युत्तरात पोलिसांनी गोळीबार केला यात बलात्काराचा आरोपी अक्षय शिंदे याला गोळी लागली या गोळीबारात अक्षय शिंदे आणि पोलीस कर्मचाऱ्यांना गोळी लागल्याने दोघाची प्रकृती चिंताजनक असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.तसेच मिळालेल्या माहितीनुसार गोळीबारात अक्षय शिंदे यांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे.
अशी घडली घटना
सायंकाळी ६:१५ वाजेच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती मिळत आहे.मुंब्रा बायपास जवळून जात असताना आरोपी अक्षय शिंदे यांनी एपीआय निलेश मोरे यांची सर्विस रिव्हॉल्व्हर घेतली त्यानंतर अक्षय शिंदे यांनी निलेश मोरे यांच्यावर ३ गोळ्या फायर केल्या त्यातील एक गोळी निलेश मोरे यांच्या पायाला लागली व २ गोळ्याचा फायर चुकण्याची माहिती मिळत आहे.त्यानंतर निलेश मोरे यांनी जखमी अवस्थेत स्वतःला वाचवण्यासाठी आरोपी अक्षय शिंदेवर हल्ला केला.पोलिसांनी प्रत्युत्तरात देताना आरोपी अक्षय शिंदे यांच्यावर गोळीबार केला त्यात अक्षय शिंदे हे जखमी झाले व त्यांला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता रुग्णालयात उपचारदरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.
0 टिप्पण्या