Ticker

6/recent/ticker-posts

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने माजी पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांचा वाढदिवस साजरा

प्रतिनिधी:जुबेर शेख

तुळजापूर: धाराशिव जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा मंत्री तसेच तुळजापूर तालुक्याचे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते,तुळजापूर तालुक्याचे माजी आमदार मधुकरराव चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त तुळजापूर येथे (दि.०४) रोजी तुळजापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आले. 


यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तुळजापूर तालुका अध्यक्ष धैर्यशील पाटील,तुळजापूर शहराध्यक्ष अमरनाना चोपदार,अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष तोफिक शेख,तुळजापूर युवक शहराध्यक्ष अक्षय परमेश्वर,तालुका उपाध्यक्ष विठ्ठल गुंड,विधानसभा उपाध्यक्ष समाधान धाकतोडे,माजी सभापती दिगंबर खराडे,अल्पसंख्यांक शहर अध्यक्ष वाहेद शेख,अल्पसंख्यांक विधानसभा अध्यक्ष इब्राहिम इनामदार,अनिल कदम,रुबाब पठाण तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या