Ticker

6/recent/ticker-posts

मार्टीची स्थापना करा;अन्यथा तीव्र आंदोलन करू...धाराशिव जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार अल्पसंख्यांक विभाग आक्रमक


प्रतिनिधी : जुबेर शेख 

धाराशिव:राज्यामध्ये मुस्लिम समाज पुरोगामी व मागासलेला असून महिमादूर रहमान समितीच्या अहवालातून हे सिद्ध झाले आहे.मुस्लिम समाजाचे मागासले पण दूर करण्यासाठी सरकारने मौलाना आझाद रिसर्च ट्रेनिंग इन्स्टिट्यूट अर्थात मार्टी या संस्थेची स्थापना करावी व या संस्थेला निधी उपलब्ध करून द्यावा अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार अल्पसंख्यांक सेलच्या वतीने तीव्र आंदोलन करू असा इशारा धाराशिव जिल्हाधिकारी व तुळजापूर तहसीलदार यांना निवेदनाद्वारे सोमवारी सरकारला दिला.

    धाराशिव येथे जिल्हाधिकाऱी यांना निवेदन देताना

संपूर्ण राज्यात अल्पसंख्यांक विभागाच्या वतीने निवेदन देऊन सरकारकडे मार्टी संस्थेची स्थापना करण्यात यावी त्याकरिता जिल्ह्यात,तालुक्यात निवेदन देण्यात आले आहे. 

त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागांच्या वतीने धाराशिव जिल्हाधिकारी यांना जिल्हाध्यक्ष तोफिक शेख तसेच तुळजापूर तहसीलदार यांना शहराध्यक्ष वाहेद शेख यांनी निवेदन देऊन सरकारकडे मार्टी संस्थेची स्थापना करावी यासाठी मागणी केली आहे.

    तुळजापूर येथे तहसिलदार यांना निवेदन देताना 

निवेदनात म्हटले आहे की,मुस्लिम समाज हा पुरोगामी महाराष्ट्रात मागासलेला आहे.हे महेमदुर रहमान समितीच्या अहवालातून सिद्ध झाले आहे. मुस्लिम समाजाचा मागासलेपणा दूर करण्यासाठी,त्यांच्या शैक्षणिक विकासासाठी व मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अल्पसंख्यांक विभागाने मौलाना आझाद रिसर्च ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (मार्टी) स्थापन करण्याचा प्रस्ताव सादर केला होता.परंतु दुर्दैवाने वित्त विभागाने ते नाकारले आहे. सर्व समाजाचा समांतर विकास हे पुरोगामी महाराष्ट्राचे धोरण आहे. इतर समाजाच्या शैक्षणिक विकासासाठी बार्टी,सारथी,महाज्योती अशा संस्था कार्य करत असताना मराठी मुसलमानावर अन्याय का? असा सवालही निवेदनात केला आहे.

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष कादर खान पठाण,माजी नगराध्यक्ष खलिफा खुरेशी,शहराध्यक्ष आयाज भाई शेख,जिल्हा उपाध्यक्ष वाजीद पठाण,नगरसेवक बाबा भाई मुजावर,नगरसेवक इस्माईल शेख,अल्पसंख्यांक शहराध्यक्ष इस्माईल काझी,अतीक शेख अफरोज पीरजादे,बिलाल तांबोळी,मकसूद शेख,अल्पसंख्यांक तालुका कार्याध्यक्ष आरिफ भाई बागवान,अमजद शेख,शहराध्यक्ष वाहिद भाई शेख,नेहाल मुलानी,पठाण मझहर,इमरान खान,अन्वर शेख,एजाज काझी,नईम पठाण,असिफ काझी,मोसिन शेख,गयास मुल्ला,शेख अस्लम,तुळजापूर प्रभारी युवक तालुकाध्यक्ष शरद जगदाळे,युवक शहराध्यक्ष अक्षय परमेश्वर,अल्पसंख्यांक विधानसभा तालुका अध्यक्ष इब्राहिम इनामदार,अल्पसंख्यांक विधानसभा उपाध्यक्ष चांद नदाफ,निसार शानेदिवान,राहील पटेल तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या