प्रतिनिधी : फिरोज पटेल
उमरगा:उमरगा तालुक्यातील दाबका येथील ॲड.फरहीन खान पटेल व्यवसायाने अधिवक्ता असून जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय उमरगा या ठिकाणी अधिवक्ता आहेत.सन २०१२ पासून ते वकीली क्षेत्रात कार्यरत आहे.तसेच कायदेविषयक शिबीर मार्फत तसेच सार्वजनिक ठिकाणी घेण्यात येणारे कार्यक्रम तसेच अंगणवाडी,शाळा,महाविद्यालय बचत गटातील महिलांचे कार्यक्रम तसेच महिलांशी संबंधित इतर कार्यक्रम इ.अशा सर्व प्रकारच्या घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमात त्यांचे हक्क,जबाबदाऱ्या तसेच उज्वल भविष्याबद्दल मार्गदर्शन करून त्यांच्यामध्ये सक्षमीकरण,सशक्तिकरण,सबलीकरण आणि जागरूकता आणण्याचे कार्य करत आहेत.
तसेच विविध महापुरुषांच्या जयंतीनिमित्त लेख व्याख्यान यातून त्यांचे विचार जनमाणसात पोहोचवण्याचे व विविध विषयावर समाज प्रबोधन करण्याचे कार्य करत असतात.तसेच साहित्य क्षेत्रातही त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर स्वलिखित काव्यरचना करत असतात.
त्यांच्या या कार्याची दखल घेऊन शांतिदूत परिवारातर्फे सामाजिक सेवा गौरव पुरस्कार २०२४ ने त्यांचा गौरव करण्यात आला आहे.
तसेच अव्यक्त अबोली साहित्य मंच पुलगाव तर्फे वनश्री पुरस्कार प्राप्त २०२४ झालेले आहे. (दि.०३) रोजी दाबका ग्रामपंचायतच्या वतीने देण्यात येणारा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार मा.आ.ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते देण्यात आला आहे.
0 टिप्पण्या