Ticker

6/recent/ticker-posts

स्वाभिमानी शिक्षक व कर्मचारी महासंघाची कोअर कमिटीची बैठक


प्रतिनिधी : बापूसाहेब आडसूळ 

सोलापूर:स्वाभिमानी शिक्षक व कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य व मंत्रालय समन्वय समिती मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक दिनाचे औचित्य साधून आठ सप्टेंबर रोजी राज्यस्तरीय आदर्श शाळा,आदर्श मुख्याध्यापक,आदर्श शिक्षक,आदर्श कर्मचारी पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या उत्साहामध्ये घेत आहोत त्या संदर्भात चर्चा करण्याबाबत राज्यस्तरीय कोअर कमिटीची बैठक शासकीय विश्रामगृह सोलापूर येथे मंगळवार 6 सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता आयोजित केलेली आहे अशी माहिती स्वाभिमानी शिक्षक व कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष व सदस्य मंत्रालय समन्वय समिती मुंबई,श्री तुळजाभवानी बहुउद्देशीय समाजसेवी संस्थेचे संस्थापक सचिव बापूसाहेब आडसूळ यांनी दिली यावेळी राज्य पदाधिकारी निवडीही करण्यात येणार आहेत.

सदर कोअर कमिटी साठी राज्यातील कोअर कमिटीच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी उपस्थित रहावे असे आव्हान सदस्य मंत्रालय समन्वय समिती मुंबई,प्रदेशाध्यक्ष बापूसाहेब आडसूळ यांनी केले आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या