Ticker

6/recent/ticker-posts

पूरग्रस्त उजनीकरांसाठी दिवाळीपूर्वी दिलासा; राज योगिराज पाटील यांच्या पाठपुराव्याला यश, पालकमंत्र्यांकडून तात्काळ मदतीचे आदेश

 

प्रतिनिधी : अशोक गरड 

उजनी (ता. औसा) : येथील तेरणा नदीला आलेल्या पूरामुळे हॉटेल, टेलरिंग, पानटपऱ्या तसेच छोट्या व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, याचा त्वरित दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राज योगिराज पाटील यांनी महाराष्ट्र राज्याचे बांधकाम मंत्री व लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांची मंत्रालयात भेट घेतली आणि पूरग्रस्त व्यापाऱ्यांना व रहिवाशांना दिवाळीपूर्वीच आर्थिक मदत देण्याची ठाम मागणी केली.

या भेटीत पाटील यांनी शॉप एक्ट लायसन्स नसलेल्या व्यापाऱ्यांनाही नियमात बसवून मदत द्यावी, ज्यांच्या घरात पुराचे पाणी शिरले आहे किंवा पडझड झाली आहे, त्यांना तातडीने मदत मिळावी, अशा मागण्यांसह नवीन ग्रामपंचायत इमारत मंजूर करणे, तेरणा नदीचे खोलीकरण, उजनी ते ककासपूर-कनगरा मार्गावरील नदीवर नवीन पूल बांधणे, उजनी बाजार चौक ते एकंबीपर्यंत सिमेंट काँक्रीट रस्ता व दुभाजक तयार करणे, राधानगर वसाहतीसाठी सिमेंट नाली बांधणे व जुन्या पुलाऐवजी नवीन पूल उभारणे अशा अनेक मूलभूत सुविधा व विकास कामांची गरज अधोरेखित केली.

या सर्व मागण्यांवर तात्काळ सकारात्मक निर्णय घेत, पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी शासनाच्या वतीने मदतीचे आदेश आपल्या स्वाक्षरीने मंत्रालयातून जारी केले असून, संबंधित विभागांना तातडीने अंमलबजावणीचे निर्देशही देण्यात आले आहेत. त्यामुळे उजनीतील पूरग्रस्त व्यापाऱ्यांना आणि नागरिकांना दिवाळीपूर्वीच मोठा दिलासा मिळणार आहे.

उजनी हे औसा तालुक्यातील ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि व्यापारी दृष्टिकोनातून महत्त्वाचे गाव असून, सुमारे १५ हजारांहून अधिक लोकसंख्या व जवळपास २५ गावांची बाजारपेठ म्हणून याची ओळख आहे. २०१५ मध्ये तेरणा नदीचे खोलीकरण झाले असले तरी वारंवार पूरस्थिती उद्भवत असल्यामुळे स्थायीक उपाययोजना राबवण्याची गरज राज पाटील यांनी ठामपणे मांडली, ज्याला शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या