Ticker

6/recent/ticker-posts

महिला शक्तीचा नवा झेंडा! मीनाताई सोमाजी कदम यांच्या नेतृत्वाखाली महिला सेनेत नवचैतन्य

 

प्रतिनिधी : जुबेर शेख

तुळजापूर : शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पक्ष सचिव संजय पुष्पलता मोरे यांच्या स्वाक्षरीने धाराशिव जिल्ह्यातील उमरगा-लोहारा व तुळजापूर विधानसभा क्षेत्रासाठी श्रीमती मीनाताई रामचंद्र सोमाजी कदम यांची महिला सेना जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.


काही महिन्यांपूर्वीच भारतीय जनता पक्षातून शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर मीनाताई सोमाजी कदम यांना आता शिवसेनेच्या वतीने धाराशिव जिल्ह्याची मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे त्यांच्या नेतृत्वाला पक्षांतर्गत मोठा सन्मान मिळाल्याचे मानले जात आहे.

ही नियुक्ती महिला सेनेच्या कार्यात नवचैतन्य निर्माण करणारी ठरली असून, पक्षाच्या महिला आघाडीला नवसंजीवनी मिळाल्याची भावना शिवसैनिकांमध्ये व्यक्त होत आहे. नियुक्तीपत्राचे वितरण पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आले.


या कार्यक्रमास जिल्हा प्रमुख मोहन पणुरे, तालुकाप्रमुख अमोल जाधव, शहर संघटक प्रशांत (नितीन) मस्के, उपशहरप्रमुख रमेश (काका) चिवचवे, शहाजी हाके, स्वप्निल सुरवसे, अंकुश रुपनर, गणेश पाटील, संजय लोंढे तसेच महिला पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


या वेळी बोलताना श्रीमती मीनाताई सोमाजी कदम म्हणाल्या, “महिला सेनेच्या माध्यमातून महिलांच्या हक्कांसाठी, त्यांच्या सामाजिक व राजकीय सहभागासाठी आणि पक्षविस्तारासाठी मी पूर्ण ताकदीने कार्यरत राहीन.”


महिला नेतृत्वाच्या माध्यमातून पक्ष संघटन अधिक बळकट होईल, असा विश्वास जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी व्यक्त केला असून, आगामी काळात महिला सेनेच्या उपक्रमांना नवे दिशा आणि वेग मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या