Ticker

6/recent/ticker-posts

शिवसेनेचा तुळजापूर तालुक्यात शाखा उद्घाटनाचा धडाका सुरूच..!आतापर्यंत तब्बल ४५ हून अधिक शाखांचे उद्घाटन संपन्न

 

प्रतिनिधी : जुबेर शेख 

तुळजापूर : शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार,पक्षसंघटन मजबूत करण्याच्या उद्देशाने तुळजापूर तालुक्यात शिवसेनेचा विस्तार झपाट्याने सुरू आहे.पक्षाचे सचिव संजय मोरे,उपनेते ज्ञानराज चौगुले,जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक,सहसंपर्कप्रमुख भगवान देवकते व धाराशिव जिल्हाप्रमुख मोहन पनुरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे.


तालुक्यातील काटी,वडगाव काटी व बिजनवाडी या गावांमध्ये नुकतेच शाखा उद्घाटन सोहळे मोठ्या उत्साहात पार पडले. या उद्घाटन कार्यक्रमाला तुळजापूर तालुकाध्यक्ष अमोल जाधव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या नेतृत्वाखाली सध्या संपूर्ण तुळजापूर तालुक्यात एकामागोमाग एक गावांमध्ये शाखा उघडण्याचा धडाका सुरू असून आतापर्यंत ४५ हून अधिक शाखांचे उद्घाटन करण्यात आले आहे.


तालुकाध्यक्ष अमोल जाधव यांनी या प्रसंगी बोलताना सांगितले की,“शिवसेना पक्षप्रमुख मा. एकनाथ शिंदे साहेबांचे विचार आणि विकासाचे धोरण प्रत्येक गावापर्यंत पोहोचवणे हे आपले प्रमुख ध्येय आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने गावोगावी पक्षाची संघटना मजबूत करून जनतेच्या अडचणी सोडवण्याचे कार्य हाती घ्यावे.”


या सोहळ्याला संबंधित गावांतील शाखाध्यक्ष,उपाध्यक्ष,सचिव,कोषाध्यक्ष,सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.उद्घाटनावेळी गावातील युवक व कार्यकर्त्यांचा उत्साह गगनात पोहोचल्याचे दृश्य पाहायला मिळाले.


कार्यक्रमास तुळजापूर शहर प्रमुख बापूसाहेब भोसले,शहर उपाध्यक्ष रमेश चिवचिवे,संभाजी नेपते,शहाजी हाके,स्वप्निल सुरवसे,संजय लोंढे,नितीन मस्के,गणेश पाटील,विकास जाधव,भुजंग मुकेरकर यांसह शिवसेनेचे मान्यवर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


या उत्साहवर्धक उपक्रमामुळे तुळजापूर तालुक्यातील शिवसेना संघटन अधिक बळकट होत असून,पक्षाच्या पुढील निवडणुकांच्या तयारीसाठी एक ठोस पाया रचला जात असल्याचे राजकीय वर्तुळातून सांगण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या