प्रतिनीधी : जुबेर शेख
धाराशिव : धाराशिव जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज आरक्षण सोडत प्रक्रिया पार पडली. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय व सर्वसाधारण गटासाठी आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. या आरक्षण सोडतीनंतर आगामी निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे.
अनुसूचित जाती गटासाठी आरक्षण
एकूण ९ जागा अनुसूचित जाती गटासाठी राखीव असून त्यापैकी ५ जागा महिला उमेदवारांसाठी राखीव आहेत.
या गटातील राखीव जागा पुढीलप्रमाणे आहेत:
सिंदफळ (महिला), वडगांव सि (महिला), डिकसळ (महिला), सांजा, येरमाळा (येरमाळा), काक्रबा, खामसवाडी, सास्तुर (महिला), शहापूर.
अनुसूचित जमाती गटासाठी आरक्षण
अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी १ जागा राखीव ठरविण्यात आली असून ती ढोकी या मतदारसंघासाठी निश्चित करण्यात आली आहे.
इतर मागासवर्गीय (OBC) गटासाठी आरक्षण
एकूण १४ जागा इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी राखीव असून त्यापैकी ७ महिला जागा आहेत.
या गटातील जागा पुढीलप्रमाणे जाहीर झाल्या आहेत:
वालवड (महिला), शिराढोण, उपळा (महिला), पळसप, येडशी, काटी (महिला), काटगाव, लोणी (महिला), येणेगुर (महिला), मोहा (महिला), मंगरूळ, पाथरूड, तुरोरी (महिला), सुकटा (महिला).
सर्वसाधारण गटासाठी आरक्षण
सर्वसाधारण गटासाठी ३१ जागा निश्चित करण्यात आल्या असून त्यापैकी १६ जागा महिला उमेदवारांसाठी राखीव आहेत.
या गटातील जागा पुढीलप्रमाणे:
ईट (महिला), आष्टा, पारगांव (महिला), पारा (महिला), तेरखेडा, ईटकुर, मंगरुळ (महिला), नायगांव, कोंड (महिला), तेर (तेर), अंबेजवळगा (महिला), पाडोळी, केशेगांव (महिला), बेंबळी, शेळगाव, आनाळा (महिला), जवळा (नि), डोंजा, जळकोट (महिला), अणदूर, नंदगाव, कानेगाव (महिला), माकणी (महिला), जेवळी (महिला), कवठा, बलसूर (महिला), कुन्हाळी (महिला), गुंजोटी, दाळिंब, आलूर, कदेर (महिला).
या आरक्षण सोडतीनंतर जिल्हाभरात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अनेक इच्छुक उमेदवारांनी आपल्या मतदारसंघात प्रचाराची पूर्वतयारी सुरू केली आहे. विशेषतः महिला आरक्षणाचा मोठा हिस्सा असल्याने अनेक नवोदित महिलांना राजकारणात संधी मिळणार आहे.
जिल्हा परिषदेच्या या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून, आता पक्षीय तिकीट वाटप आणि स्थानिक समीकरणे कशी बसवली जातात याकडे सर्वांचे लक्ष आहे.

0 टिप्पण्या