प्रतिनिधी : राम थोरात
तुळजापूर : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून तुळजापूर पोलीस स्टेशन परिसरात हरित व स्वच्छ वातावरण निर्माण करण्यासाठी वृक्षलागवड करण्यात आली. हा उपक्रम होमगार्ड पथक तुळजापूर व सर्व होमगार्ड बांधवांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आला.
या वृक्षलागवड उपक्रमाला तुळजापूर पथक तालुका समादेशक अधिकारी रणजितसिंह रोकडे, वरिष्ठ फलटणनायक शशिकांत मंडुळे, फलटण नायक महादेव सोनवणे, राघव गायकवाड, श्रीमती दिलशाद बागवान, नामदेव ढेरे, अनिल धुमाळ, सिद्धगणेश यांच्यासह सर्व होमगार्ड बांधव उपस्थित होते.
यावेळी बोलताना अधिकारी रणजितसिंह रोकडे यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामातील शहीदांना विनम्र अभिवादन केले. तसेच वृक्षलागवड हीच खरी सामाजिक जबाबदारी असून पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले.
या उपक्रमाद्वारे मुक्ती संग्रामातील शौर्याचा स्मरण करताना समाजहितासाठी कार्य करण्याचा संकल्प करण्यात आला. वृक्षलागवडीमुळे परिसरात हरिताई वाढून आगामी पिढ्यांना स्वच्छ हवा व आरोग्यदायी वातावरण लाभणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
0 टिप्पण्या