प्रतिनिधी : जुबेर शेख
तुळजापूर : तुळजापूर तालुक्यातील मौजे सारोळा येथे शिवसेनेच्या शाखेचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. मात्र या कार्यक्रमाच्या वेळी अचानक गावातील वीजपुरवठा खंडित झाल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी हा वीजपुरवठा विरोधकांच्या डावामुळे खंडित करण्यात आला असल्याची चर्चा गावभर रंगली.
शाखा उद्घाटनासाठी तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला गावात वीजपुरवठा सुरू असतानाच उद्घाटन सोहळ्याच्या वेळीच लाईट गेल्याने मुद्दाम विरोधकांनी हा डाव खेळल्याची चर्चा सुरू झाली. मात्र वीजपुरवठा खंडित झाला तरी शिवसैनिकांनी हार न मानता स्वतःच्या गाड्यांच्या लाईटच्या प्रकाशातच शाखा उद्घाटनाचा सोहळा भव्य दिव्य पद्धतीने पार पाडला.
या प्रसंगी तालुकाप्रमुख अमोल जाधव यांनी विरोधकांवर निशाणा साधत म्हटले की, “विरोधक काहीही डाव टाकले तरी शिवसेना तालुक्यात थांबणार नाही. आम्ही राजकारण करत नाही, तर समाजकारण करतो. लोकांची मदत करणे हाच आमचा खरा उद्देश आहे.”
कार्यक्रमाला उपस्थित शिवसैनिकांनीही उत्साहात घोषणा देत शाखा उद्घाटन सोहळा यशस्वी केला. वीजपुरवठा खंडित होऊनही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा आणि कार्यकर्त्यांचा जोश कमी झाला नाही हे विशेष.या घटनेनंतर गावात मात्र चर्चेला उधाण आले असून, कार्यक्रमाच्या वेळीच लाईट जाणे हा अपघात होता की मुद्दाम डाव, याबाबत वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत.यावरून एक गोष्ट स्पष्ट झाली की, विरोधक कितीही अडथळे आणले तरी शिवसेनेच्या तालुक्यातील वाढत्या प्रभावाला थांबवणे सोपे नाही.
शाखा उद्घाटन वेळी तुळजापूर तालुका प्रमुख अमोल जाधव,शेतकरी सेनेचे तालुकाप्रमुख गणेश नेपते,तुळजापूर शहर प्रमुख बापूसाहेब भोसले,शहर संघटक नितीन मस्के,विकास जाधव,संभाजी नेपते तसेच सारोळा गावातील शाखाप्रमुख उपशाखाप्रमुख कार्याध्यक्ष सचिव तसेच शाखेचे सदस्य व असंख्य शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या