Ticker

6/recent/ticker-posts

धाराशिव तालुक्यात किशोर साळुंखे यांच्यावर शिवसेनेची सोशल मीडिया जबाबदारी

 

प्रतिनिधी : जुबेर शेख 

धाराशिव: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या धाराशिव तालुका सोशल मीडिया प्रमुखपदी किशोर वसंतराव साळुंखे यांची निवड करण्यात आली आहे. आजवर त्यांनी दाखविलेल्या निष्ठावंत कार्याची आणि पक्षाप्रती असलेल्या निष्ठेची दखल घेत ही निवड करण्यात आली.


धाराशिव जिल्हाप्रमुख तथा आमदार कैलास दादा घाडगे पाटील यांच्या हस्ते साळुंखे यांना निवडीचे पत्र प्रदान करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी बोलताना आमदार कैलासदादा म्हणाले की, “पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आपण आपले योगदान निश्चितपणे द्याल, अशी आम्हाला आशा आहे.”


निवडीनंतर आपल्या भावना व्यक्त करताना किशोर साळुंखे म्हणाले की, “आजपर्यंत पक्षासोबत एकनिष्ठ राहून काम केले आहे. पक्षाने माझ्या खांद्यावर ठेवलेली ही जबाबदारी मोठा सन्मान असून, आगामी काळात पक्षाचे विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवून योग्य तो न्याय देण्याचा प्रयत्न करेन आणि चांगले कार्य उभे करेन.”


या वेळी त्यांच्या सोबत राज भैय्या जाधव सोशल मीडिया जिल्हाप्रमुख, राकेश सूर्यवंशी युवा सेना तालुकाप्रमुख,गफूर भाई शेख उप तालुका प्रमुख,शाम भैय्या जाधव जेष्ठ शिवसेना नेते,नाना गरड सरपंच खेड,अनुरथ दूधभाते सरपंच मेडसिंगा,बालाजी वाघमारे,सागर शित्रे,अमित आगळे,रमाकांत जाधव,मनोज शित्रे,महादेव कचरे,इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते 


या निवडीमुळे धाराशिव तालुक्यातील शिवसेना पक्षाच्या सोशल मीडिया संघटनेला नवा जोम मिळाला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या