प्रतिनिधी : मिलिंद भांगरे
पुणे : आंबेगाव तालुका मराठी पत्रकार संघ (रजिस्टर) यांची नवी कार्यकारिणी एकमताने निवडून आली असून अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार राजाराम उर्फ राजू देवडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ही निवड प्रक्रिया मंचर येथे पार पडली. या वेळी संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची एकमुखाने निवड झाली असून पत्रकार बांधवांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.
संघटनेचे उपाध्यक्षपदी विजय कानसकर आणि नवनाथ फलके यांची निवड झाली असून सचिवपदी राजेश चासकर, सहसचिव सुधीर हिंगे यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली. कार्यकारिणी सदस्य म्हणून विनोद शेटे, समीर गोरडे, उत्तम टाव्हरे, मिलिंद भांगरे, माधव भुते, भगवान भोर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
तसेच सदस्यपदी विलास काळे, किशोर वाघमारे, विलास भोर, आयुब शेख, उत्तम टाव्हरे यांचा समावेश करण्यात आला आहे. ही निवड एकमताने व शांततेत पार पडली.
या निवडीनंतर पत्रकार संघाच्या नव्या कार्यकारिणीस शुभेच्छा देण्यासाठी संघटनेचे मार्गदर्शक संजय कोकणे, संदीप खळे, सदानंद शेवाळे, गिरीश दरेकर, मनोज तळेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत संघटना अधिक बळकट करण्याच्या दिशेने कार्य करण्याचे आवाहन केले.
नवीन कार्यकारिणीच्या माध्यमातून पत्रकारांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करून संघटना अधिक सक्रिय व परिणामकारक होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. मंचर परिसरात पार पडलेल्या या निवड प्रक्रियेने पत्रकार संघटनेच्या कार्यात नवचैतन्य निर्माण होण्यास मदत होणार आहे.
0 टिप्पण्या