Ticker

6/recent/ticker-posts

तुळजापूर नगरपरिषद 2025:प्रभाग रचना जाहीर,नागरिकांना 31 ऑगस्टपर्यंत हरकतीची मुदत

 

प्रतिनिधी : जुबेर शेख 

तुळजापूर नगरपरिषद तुळजापूरच्या 2025 च्या निवडणुकीसाठीची प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. 2022 मध्ये ठरविण्यात आलेलीच प्रभाग रचना यंदा कायम ठेवण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मागील चार वर्षांपासून रखडलेल्या पालिका निवडणूक प्रक्रियेला अखेर गती मिळाली आहे.


नागरिकांना या प्रभाग रचनेवर हरकती नोंदवण्यासाठी 31 ऑगस्ट 2025 दुपारी 03 वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. प्रत्येक प्रभागात सुमारे 2700 ते 3200 मतदार असणार असून, प्रभाग क्रमांक 11 मध्ये तब्बल 4800 मतदार नोंदवले गेले आहेत.


नवीन रचनेनुसार प्रभाग क्रमांक 1 ते 10 मध्ये प्रत्येकी दोन नगरसेवक तर प्रभाग क्रमांक 11 मध्ये तीन नगरसेवक निवडून देण्यात येणार आहेत.


1. प्रभाग क्रमांक 1 – लोकसंख्या 2783


तुळजापूर खुर्द, तुळजाई नगर, सहारा गौरव, बाह्यवळण रस्त्यापर्यंत


2. प्रभाग क्रमांक 2 – लोकसंख्या 2760


अर्धा हडको परिसर, संत सेवालाल नगर, आयोध्या नगर, विश्वास नगर


3. प्रभाग क्रमांक 3 – लोकसंख्या 3091


जिजामाता नगर, मायक्रो टॉवर, अर्धा हडको परिसर


4. प्रभाग क्रमांक 4 – लोकसंख्या 3371


मंकावती गल्ली, साळुंखे गल्ली, टेलिफोन ऑफिस, सराया धर्मशाळा, कवठेकर गल्ली, आर्य चौक


5. प्रभाग क्रमांक 5 – लोकसंख्या 3352


खटकाळ गल्ली, कणे गल्ली, अण्णाभाऊ साठे नगर, भोसले गल्ली


6. प्रभाग क्रमांक 6 – लोकसंख्या 3276


आरादवाडी, भीम नगर, सिद्धार्थ नगर, अमृतराव गल्ली, वेताळ नगर


7. प्रभाग क्रमांक 7 – लोकसंख्या 2776


पंढरपूर गल्ली, जवाहर गल्ली, कमान वेस, बाबजी अड्डा


8. प्रभाग क्रमांक 8 – लोकसंख्या 3146


संत रोहिदास नगर, वेताळ झोपडपट्टी, कुंभार गल्ली


9. प्रभाग क्रमांक 9 – लोकसंख्या 3206


बजरंग नगर, घाटशीळ मंदिर, दीपक चौक, पेट्रोल पंप


10. प्रभाग क्रमांक 10 – लोकसंख्या 2740


सावरकर चौक, नळदुर्ग रोड, गोपाळ नगर (पूर्व), मंगळवार पेठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक


11. प्रभाग क्रमांक 11 – लोकसंख्या 4802


लोहिया मंगल कार्यालय, माऊली नगर, एसटी कॉलनी, अभियांत्रिकी महाविद्यालय, नळदुर्ग रोड, पापनस झोपडपट्टी


या रचनेवर हरकती आणि सूचना नागरिकांना देण्याची संधी आहे. 31 ऑगस्ट 2025 दुपारी 03 वाजेपर्यंत हरकती दाखल झाल्यानंतर अंतिम प्रभाग रचना निश्चित होणार असून, त्यानंतर निवडणूक प्रक्रियेला अधिकृत सुरुवात होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या