Ticker

6/recent/ticker-posts

जीर्णोद्धार कामासाठी तुळजाभवानी मंदिरातील धर्मदर्शन व पेडदर्शन 20 ऑगस्टपर्यंत बंद - मुख दर्शन सुरु राहणार

प्रतिनिधी : जुबेर शेख 

तुळजापूर:श्री तुळजाभवानी मंदिरातील सिंहासनाच्या गाभाऱ्यात पुरातत्त्व खात्यामार्फत 1 ऑगस्ट 2025 पासून सुरू करण्यात आलेली जीर्णोद्धाराची कामे येत्या 10 ऑगस्ट 2025 (रविवार) पर्यंत पार पडणार होती. मात्र, कामासाठी अधिक वेळ लागणार असल्याने ही कालमर्यादा आता वाढवण्यात आली आहे.


नवीन सुधारित वेळेनुसार, 11 ऑगस्ट 2025 (सोमवार) पासून 20 ऑगस्ट 2025 (बुधवार) पर्यंत सिंहासन गाभाऱ्यातील कामकाज चालू राहणार आहे. त्यामुळे या कालावधीत देवीजींचे मुख्य दर्शन, सिंहासन पूजा, अभिषेक पूजा व इतर धार्मिक विधी नियमानुसार चालू ठेवण्यात येणार असले तरी धर्मदर्शन तसेच देणगी दर्शन काही काळासाठी बंद राहणार आहे.

या संदर्भात तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान अरविंद बोळंगे यांनी प्रसिद्ध जाहिर पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.


भाविक भक्तांनी व सेवेकर्‍यांनी याची नोंद घ्यावी व सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या