Ticker

6/recent/ticker-posts

तुळजापूर तालुक्यात ‘शिवसेना आरोग्य वारी’ उपक्रम राबविण्याची घोषणा – तालुक्यातील हजारो वृद्धांना मिळणार डोळ्यांचे आरोग्य लाभ

 

प्रतिनिधी : जुबेर शेख 

तुळजापूर : तुळजापूर तालुक्यातील अनेक वृद्ध नागरिक अजूनही प्राथमिक आरोग्य सुविधांपासून वंचित आहेत. ही गरज लक्षात घेऊन तुळजापूर तालुक्यातील शिवसेना पक्षाच्या वतीने एक व्यापक आरोग्य उपक्रम हाती घेण्यात येणार आहे. तालुकाध्यक्ष अमोल जाधव यांच्या संकल्पनेतून "शिवसेना आरोग्य वारी" हा अभिनव उपक्रम संपूर्ण तालुक्यात राबविण्यात येणार आहे.


हा उपक्रमाचा शुभारंभ लवकरच करण्यात येणार आहे.तसेच या उपक्रमाची सुरूवात तुळजापूर शहरातून होणार आहे.


या उपक्रमांतर्गत तुळजापूर तालुक्यातील प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये मोफत डोळे तपासणी तसेच मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, या शस्त्रक्रियेसाठी राज्यातील अग्रगण्य व मान्यताप्राप्त रुग्णालयांमध्ये उपचाराची व्यवस्था करण्यात आली असून, शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला घरी सोडण्यापर्यंतची सर्व जबाबदारी स्थानिक शिवसैनिक पेलवणार आहेत.


तालुकाध्यक्ष अमोल जाधव यांनी सांगितले की, “या उपक्रमामध्ये केवळ तपासणी आणि उपचार नव्हे तर रुग्णाची प्रत्येक पायरीवर सेवा ही आमची जबाबदारी असेल. हे केवळ सामाजिक उत्तरदायित्व नव्हे तर ही खरी ‘रुग्णसेवा’ आहे, अशी आमची भावना आहे.”


‘शिवसेना आरोग्य वारी’ उपक्रमाचे वैशिष्ट्ये:


प्रत्येक जिल्हा परिषद गटात आरोग्य शिबिराचे आयोजन


मोफत डोळे तपासणी व आवश्यकतेनुसार मोतीबिंदू शस्त्रक्रिया


महाराष्ट्रातील टॉप हॉस्पिटलमध्ये उपचारांची व्यवस्था


रुग्णास शस्त्रक्रियेनंतर घरी सोडण्याची संपूर्ण जबाबदारी शिवसैनिकांची


शिबिरांमध्ये आवश्यकतेनुसार इतर प्राथमिक आरोग्य सुविधा पुरविण्याचा मानस



या उपक्रमामुळे तालुक्यातील अनेक वृद्ध नागरिकांना नवदृष्टी लाभणार असून, त्यांच्या जीवनशैलीत लक्षणीय बदल घडून येणार आहे. शिवसेनेच्या या सामाजिक उपक्रमाचे सर्वत्र स्वागत होत असून, आरोग्य वारी तालुक्यातील आरोग्य सेवेच्या दिशेने एक मोठे पाऊल ठरणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या