Ticker

6/recent/ticker-posts

धाराशिव जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी कीर्ती किरण एच. कुमार यांचे तुळजापूर येथे जल्लोषात स्वागत


प्रतिनिधी : जुबेर शेख 

तुळजापूर: धाराशिव जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी म्हणून मा. श्री. कीर्ती किरण एच. कुमार यांनी नुकताच पदभार स्वीकारला. त्यांच्या स्वागतासाठी शिवसेना शिंदे गटाच्या वतीने भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. शहरप्रमुख बापूसाहेब भोसले, शिवसैनिक अमोल जाधव, संभाजी नेपते तसेच तालुका व शहरातील अनेक शिवसैनिक व नागरिकांच्या उपस्थितीत त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना शहरप्रमुख बापूसाहेब भोसले यांनी जिल्हाधिकारी साहेबांना शुभेच्छा देत धाराशिवच्या विकासासाठी आणि प्रशासनात पारदर्शकता आणण्यासाठी त्यांचे सहकार्य असेल, असे सांगितले. तसेच, जिल्हा भ्रष्टाचारमुक्त होण्याच्या दृष्टीने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

तालुक्यातील विविध समस्या, अपूर्ण विकास प्रकल्प, नागरिकांच्या अडचणी आणि प्रशासनातील पारदर्शकता यासंबंधी जिल्हाधिकारी साहेबांशी संवाद साधण्यात आला. त्यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी सहकार्याची ग्वाही दिली व प्रशासन लोकहितासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.

यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी आई तुळजाभवानीच्या कृपेने जिल्ह्याचा सर्वांगीण विकास व्हावा आणि भ्रष्टाचारमुक्त प्रशासन यावे, यासाठी जिल्हाधिकारी साहेबांच्या रूपाने नवी ऊर्जा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.

कार्यक्रमास अनेक मान्यवर उपस्थित होते. सत्कार समारंभाच्या निमित्ताने जिल्हा प्रशासन व स्थानिक नागरिक यांच्यातील सहकार्याची नवी दिशा ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या