प्रतिनिधी: जुबेर शेख
तुळजापूर: महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जाहीर होताच सर्व राजकीय पक्षांकडून विविध विधानसभेच्या उमेदवारांची घोषणा होण्यास सुरुवात झाली आहे.त्यातच आज तुळजापूर विधानसभेसाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने राणाजगजितसिंह पाटील यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली असून आता तुळजापूर विधानसभेसाठी चौरंगी लढत होणार हे निश्चित आहे.
येत्या एक ते दोन दिवसांमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवाराची घोषणा होण्याची शक्यता आहे.विद्यमान आ.राणाजगजितसिंह पाटील यांना टक्कर देण्यासाठी महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
0 टिप्पण्या