प्रतिनिधी : फिरोज पटेल
आलूर : आलूर ता.उमरगा हे गाव कर्नाटक राज्याच्या सीमेवरती वसलेले असून, या गावची लोकसंख्या सुमारे 18 ते 20 हजार असून, या गावाला जाणारा स्मशानभूमीला रस्ता अत्यंत चिखलदायी व खराब रस्त्यामुळे अंत्यसंस्कारला जाणाऱ्या रस्त्याचे पूर्ण काम कधीही झालेले नाही,भारत स्वतंत्र होऊन 75 वर्षे उलटले तरीही या गावाला मूलभूत सुविधा पासून वंचित राहावे लागलेले आहे. हे या गावचे दुर्दैव आहे.
गेल्या पंधरा वर्षापासून आमदार ज्ञानराज चौगुले या गावाला एकही रुपया निधी दिलेला नसून, जर 15 वर्षात स्मशानभूमीचा रस्ता होण्यासाठी शासन निधी देत नसेल, तर या एवढे दुर्दैव आलूर गावातील नागरिकांचे आहे. कारण ठेकेदार चार चार वेळेस या रस्त्याचे उद्घाटन करतात,आणि जनतेला सांगतात की, हा निधी दलित वस्तीचा व इतर कामासाठी वापरला जाणार असल्यामुळे हे काम होणार नाही. आमदार साहेब गेल्या पंधरा वर्षात एकही काम पूर्ण व एकही काम नवीन मंजूर केलेले नाही, त्यामुळे आलूर गावातील नागरिकात आमदार साहेबांबद्दल रोष आहे,नागरिक आमदार साहेबांना विधानसभा निवडणुकीत दाखवून देऊ, अशी गुप्त चर्चा नागरिकांतून होत आहे. आचारसंहिता लागण्याच्या आधी, चार तास आधी या रस्त्याचे उद्घाटन झाले, पण हे काम आता होणार नाही, जनतेला सुद्धा पूर्णपणे माहित आहे. त्यामुळे जनता आमदार साहेब व सरकारवर पूर्णपणे नाराज दिसत आहे. याचा फटका आमदार यांना विधानसभा निवडणुकीत बसण्याची भीती आहे. गावातील अंतर्गत रस्ते पूर्णपणे चिखलमध्ये झालेले आहेत, आरोग्य व्यवस्था नीट नाही,वीज वेळेवर राहत नाही,शेतकऱ्यांना हमीभाव नाही,विद्यार्थ्यांना वेळेवर बस नाही, ग्रामपंचायत वर नियंत्रण नाही. सर्व कारणामुळे आमदार साहेबांचा पराभव निश्चित आहे, असे मत नागरिकांतून व्यक्त होत आहे.
0 टिप्पण्या