Ticker

6/recent/ticker-posts

मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशानंतर मराठा आंदोलक मनोज जाधव लढवणार तुळजापूर विधानसभा


प्रतिनिधी : जुबेर शेख

तुळजापूर: मनोज जरांगे पाटील यांचे खंदे समर्थक मानले जाणारे मेडशिंगा येथील मराठा आरक्षणासाठी सदैव लढणारे आंदोलनातून महाराष्ट्र सरकारला धाराशिव जिल्ह्यातून घाम फोडणारे मनोज जाधव हे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या सूचनेनंतर तुळजापूर विधानसभेसाठी फॉर्म भरणार असल्याची माहिती समोर येत आहे. येणाऱ्या काळात तुळजापूर विधानसभेसाठी मनोज जरांगे पाटील यांनी उमेदवार दिल्यास विद्यमान आमदार,माजी आमदार तसेच अपक्ष उमेदवार यांनी लावलेली प्रतिष्ठा काहीशी धोक्यात असल्याचे चिन्ह निर्माण होणार आहे.

आज झालेल्या अंतरवाली सराटी येथे निर्णायक बैठकीमध्ये मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी उमेदवार उभे करण्याची घोषणा केल्यानंतर तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील ७२ गावांमधील मौजे मेडशिंगा येथील सुपुत्र मनोज जाधव हे आपला उमेदवारी अर्ज भरणार असल्याची बातमी समोर येत आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मनोज जाधव हे निवडणूक लढवणार असल्याची माहिती मिळाली आहे त्यामुळे आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये मराठा समाजाच्या वतीने उमेदवार उभा होणार असल्यास कुठे ना कुठे विद्यमान आमदारांना तसेच महाविकास आघाडीचे जे उमेदवार असतील त्यांना ही निवडणूक सोपी जाणार नाही असे चित्र वाटत आहे.तुळजापूर विधानसभेसाठी मराठा आंदोलक मनोज जाधव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यास तुळजापूर विधानसभा ही पंचरंगी होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.तसेच तुळजापूर विधानसभे कडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागणार आहे.येणाऱ्या काळात मनोज जाधव तुळजापूर विधानसभा लढवणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या