प्रतिनिधी : जुबेर शेख
परंडा: महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक जाहीर होतात सर्व राजकीय पक्षाकडून विविध विधानसभेच्या उमेदवाराची घोषणा होण्यास सुरुवात झाली आहे.त्यातच आज शिवसेना शिंदे गटाची ४५ उमेदवाराची पहिली यादी जाहीर झाली आहे.त्यात परंडा विधानसभेसाठी पुन्हा एकदा तानाजी सावंत यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
त्यामुळे परंडा विधानसभेमध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी शरदचंद्र पवार मध्ये प्रमुख टक्कर होण्याची शक्यता आहे. परंडा विधानसभेमध्ये महाविकास आघाडी करून जवळपास राहुल मोटे यांचे नाव निश्चित झाले आहे अशी माहिती मिळत आहे.राहुल मोटे यांना उमेदवारी जाहीर झाल्यास तानाजी सावंत विरुद्ध राहुल मोटे असाच सामना होणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.त्यामुळे येणाऱ्या काळात परंडा मतदारसंघातील जनता कोणाच्या बाजूने उभे राहते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
0 टिप्पण्या