प्रतिनिधी : फिरोज पटेल
लोहारा:लोहारा तालुक्यातील जेवळी उत्तर येथे मुजावर गल्लीत मज्जिद संरक्षक भिंत बांधकाम करणे या कामाचे भूमिपूजन आमदार ज्ञानराजजी चौगुले यांच्या हस्ते संपन्न झाले.
या कामासाठी सुमारे २० लक्ष रुपये निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने आमदार ज्ञानराजजी चौगुले यांचा सत्कार करण्यात आला.
आ.ज्ञानराजजी चौगुले यांनी मनोगत व्यक्त करताना असे सांगितले की,मतदार संघातील सर्वच समाज घटकांना सोबत घेऊन त्यांच्या विविध समस्या राज्य शासनाकडे माडणे व शासनाच्या माध्यमातून त्यांना विविध सोयी सुविधा पुरवण्यासाठी मागील १५ वर्षापासून आपण काम करीत असून दोन्ही तालुक्यातील अधिकाधिक गावामध्ये मुस्लिम समाज बांधवांच्या मागणीनुसार कब्रस्तान संरक्षक भिंत,मस्जिद संरक्षक भिंती,कब्रस्तानचे रस्ते,ईदगाह मैदानाच्या विकास अधिकची कामे मंजूर केले आहेत.
कालच मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती शासनाने राज्यातील अल्पसंख्यांक मुस्लिम समाजातील तरुणांच्या सर्वांगीण विकासाला गती मिळावी यासाठी अल्पसंख्यांक संशोधन व प्रशिक्षण संस्था मार्टी संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून येणाऱ्या काळात याचा राज्यातील अल्पसंख्यांक बांधवांनी लाभ घ्यावा.असे आवाहन यावेळी बोलताना आमदार ज्ञानराज चौगुले यांनी केले.
कार्यक्रमास शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन पणुरे,तालुकाप्रमुख जगन्नाथ पाटील,सरपंच महानंदाताई मोहन पणुरे,उपसरपंच बसवराज कारभारी,ग्रामविकास अधिकारी आर.एल वाघमारे,परवेज तांबोळी,बाबा शेख,गणीसाहेब पठाण,नजीर मुजावर,इस्माईल शेख,नसरुद्दीन शेख आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
0 टिप्पण्या