प्रतिनिधी:जुबेर शेख
तुळजापूर:राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार अल्पसंख्यांक विभागाच्या वतीने (दि.०९) रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तुळजापूर तहसीलदार मार्फत निवेदन देण्यात आले.निवेदनात असे सांगण्यात आले की, बांगलादेश येथे होत असलेल्या सत्ता परिवर्तनाच्या घटनेत बंगलादेश मध्ये आणीबाणीची स्थिती असून बांगलादेशात आराजकता पसरली आहे.या घटनेत तेथील हिंदू अल्पसंख्यांक समाज होळपळून निघत आहे.त्यांची घरे,दुकाने जाळून टाकली जात आहेत. हिंदूची प्रार्थना स्थळावर हल्ले होत आहेत आणि आपल्या भारत देशातील नागरिक व विद्यार्थी हे अजूनही तिथे अडकून आहेत. जोपर्यंत तेथील नागरिक सुरक्षित आपल्या मायदेशी परत येत नाहीत.तोपर्यंत भारत सरकारने बंगलादेश सोबत असलेले मैत्री संबंध व व्यवहार बंद करावे.
केंद्र सरकारने या निवेदनाची तात्काळ दखल घेऊन बंगलादेश येथे असलेल्या भारतीय नागरिकांना तात्काळ आपल्या मायदेशी परत आणण्यासाठी उपाययोजना कराव्यात व त्यांना आपल्या मायदेशी सुखरूप आणावे.अन्यथा येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभाग धाराशिव जिल्ह्याच्या वतीने त्रिव आंदोलन करण्यात येईल असा इशारा धाराशिव जिल्हा अध्यक्ष तोफिक शेख यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
या निवेदनावर ज्येष्ठ नेते जीवनराव गोरे,युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर,तुळजापूर तालुका अध्यक्ष धैर्यशील पाटील,प्र.युवक तालुका अध्यक्ष शरद जगदाळे,गणेश नन्नवरे,रुबाब पठाण,वाहेद शेख,इब्राहिम इनामदार,शहाजी नन्नवरे,अमोल जाधव,संजय देशमुख,राहुल हंगरगेकर,नवनाथ जगताप,आकाश शिंदे,चंद्रकांत डावरे,शहाजी कसबे,तुकाराम जगताप,व्यंकट झाडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
0 टिप्पण्या